ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मितीसंस्था ‘ढोल ताशे’नंतर आणखी एक आशयघन सिनेमा ए.आर फिल्म्सच्या सोबतीने ‘हलके हलके’ हा सिनेमा घेऊन येत आहे. नुकतचं कुमार सानू यांच्या सुरेल आवाजात या सिनेमातील ‘हलके हलके बोलणे’ हे रोमँटिक गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
सिनेमाच्या निर्मात्या ए. अनूराधा यांचे हे गायिका म्हणून पहिले गाणे असले तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे. ‘ढोल ताशे’ या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण करणारे राज अंजूटे ‘हलके हलके’ या सिनेमातून दिग्दर्शनात पर्दापण करीत आहेत. सिनेमातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यातचं ठेवण्यात आली आहेत. ए.आर.फिल्मसच्या ए अनूराधा आणि ब्रम्हांडनायक मुव्हीजच्या स्मिता अंजूटे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल, यात शंका नाही.