‘इंडीया आर्ट फेस्टीव्हल’मधील आकर्षण
‘युनीटी इन डायव्हरसीटी’ हे २४ समकालिन प्रतिभावान तसंच व्यावसायीक कलाकारांचं एकत्रीत कलाप्रदर्शन ‘इंडीया आर्ट फेस्टीव्हल’मध्ये मांडलं जाणार आहे.
‘आय क्वेस्ट आर्ट गॅलरी’तर्फे या कलाकारांच्या कलाकृती रसिकांसमोर प्रदर्शीत केल्या जाणार आहेत. मुंबईच्या नेहरू सेंटर, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई या ठिकाणी दि. ६ ते ९ ऑक्टोबर २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुलं राहील.
शरद गुरव आणि साईप्रसाद जना यांनी प्रस्तूत केलेल्या या प्रदर्शनात आनंद तोरसकर, गणपत भडके, भिवा पुणेकर, गोपाल परदेशी, पंकज बावडेकर, संदीप छत्रबन्द, नीलेश निकम, चेतना वैती, गणेश हिरे, अनंत डेरे, सिमरीत लुथत्रा, साधना संगर, रेणुका फुलसुंदर, माधवी जोशी, विश्वजित नाईक, नवनाथ चोभे, शितल राऊत, दीपा हेकरे, पारस परमार, युवराज पाटील, मनोहर राठोड, आसिफ शेख, उमेश भोई, दिनेश परमार हे प्रथितयश कलावंत भाग घेणार आहेत.
आय क्वेस्ट आर्ट गॅलरी गेल्या तीन वर्षांपासून समकालिन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून या वर्षीही ही परंपरा कायम आहे. या ठिकाणी विविध माध्यमं आणि शैलीमधल्या कलाकृती प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. तैल रंग, एक्रिलिक रंग, जलरंग, मिश्र माध्यम, चारकोल इत्यादीचा वापर करून साकार केलेल्या मुर्त, अमुर्त, अर्धमुर्त चित्रं, तसंच शिल्पकृती, चित्रआलेख अशा अनेक कलाप्रकारांचा या प्रदर्शनात आस्वाद घेता येईल.
सहभागी कलाकार अद्वितीय आणि आनंददायी अशा कलाकृती रंग आणि रेषांच्या माध्यमामधून सादर करून रसिकांची मन प्रसन्न करतील. या अप्रतिम कलाकृतींचा खजिना बुथ नंबर ११ या एकाच ठिकाणी कलारसिकांना पाहता येईल. समकालिन कलाकारांच्या कलात्मक जाणिवा, मोहक कलाकृती, तसंच मंत्रमुग्ध करणार्या रंगछटा यांचा रसिकांनी जरूर लाभ घ्यावा.