वाशीच्या इनऑर्बिट मॉल्समध्ये खास उपक्रम
आपल्या आवडत्या कार्टून पात्राला भेटणे हे लहान मुलासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे असते. नवी मुंबईत असलेल्या इनऑर्बिट मॉल्स, वाशी हा मुलाचे या मोहक पात्रांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास तयार आहे.
मॉल ‘द टून फेस्ट’ या लहान मुलांच्या आनंदोत्सवाचे यजमानपद भूषवणार आहे, ज्यात त्यांना मायटी राजू आणि सुपर भीम यांना 27 आणि 28 मे रोजी भेटता येणार आहे. त्याच बरोबर 3 आणि 4 जून रोजी छोटा भीम आणि चुटकी मॉलला भेट देणार आहेत. मुलांना या पात्रांची फक्त झलकच मिळणार नाही तर त्यांना हे क्षण कॅमेरामध्ये टिपता ही येणार आहेत.
या बरोबरच मॉलने प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य उमटावे, यासाठी काही मजेशीर उपक्रम आणि गेम्सही आणले आहेत ज्याद्वारे मुल स्वत:ला क्रियाशील उपक्रमात रममाण तर करून घेतीलच आणि अनेक सरप्रायझेसदेखीन जिंकू शकतील. तर मग इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये एका अविस्मरणीय विकेंडचा आस्वाद घ्या.
अधिक माहिती:
भेटा मायटी राजू, सुपर भीम यांना 27 आणि 28 मे 2017 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून
छोटा भीम आणि चुटकी यांना भेटा 3 जून आणि 4 जून 2017 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून