२५ डिसेंबरला ‘कलर्स ‘वर पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण
महाराष्ट्रात दर्जेदार व परवडण्याजोग्या घरांच्या निर्मितीत अग्रेसर कर्म इन्फ्रास्ट्रक्चर यावर्षीही मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स देणार असून, २५ डिसेंबर रोजी कलर्स टीव्हीवर हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.
अभिनेता व समाजसेवक विवेक ओबेरॉयच्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चरने शहापूरमध्ये (ठाणे) १५००० कुटुंबांना प्रत्येकी फक्त ७.९ लाख रुपयात घरे तयार करून दिली. महाराष्ट्रातील इतरही अनेक कुटुंबांना ५ लाखपेक्षाही परवडण्याजोगी घरे पुरवण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही कंपनी कार्यरत आहे, त्यांचा मुख्य भर ठाणे, पुणे, नागपूर व नाशिक या शहरांवर असेल.
या समाजोपयोगी उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कर्म इन्फ्रास्ट्रक्चरने फिल्मफेअरचे प्रायोजकत्व घेतले आहे. कर्म इन्फ्रास्ट्रक्चरने प्रस्तुत केलेल्या मराठी फिल्मफेअर सोहळा नामांकित मराठी तारेतारकांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने चमचमता ठरला.
स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर व इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रेटीजनी मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स रेड कार्पेटची शान वाढवली.
कर्म इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमोटर व पार्टनर, अभिनेता, सामाजिक कार्यकर्ते विवेक ओबेरॉय यांनी यावेळी सांगितले की, मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहभागी होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा नवी भरारी घेतली आहे व महाराष्ट्रात मनोरंजन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गालाही स्वतःच्या मालकीचे घर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्म इन्फ्रास्ट्रक्चरने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्ससारखा लोकप्रिय सोहळा हा योग्य मंच ठरेल असे आम्हाला वाटले. यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळेल, आमच्या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होईल, त्यामुळे आम्ही अजून जास्त लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणू शकू.
कर्मने शहापूर येथे उभारलेल्या परवडण्याजोग्या घरांच्या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित वातावरणात स्वतःचे मानाचे घर मिळेल. परवडण्याजोगी, सुरक्षित, उत्तम जीवनशैली मिळवून देणारी, चांगल्या दर्जाची घरे कर्म इन्फ्रास्ट्रक्चर बांधते. या घरांची रचना आकर्षक असते, त्यांची बांधणी करताना दर्जा, मजबुतीबरोबरीनेच कलात्मकतेलाही महत्त्व दिलेले असते.
कर्म इन्फ्रास्ट्रक्चर असे मानते की, परवडण्याजोगी घरे ही तेथील रहिवाशांसाठी जीवनशैलीत परिवर्तन घेऊन येणारी ठरावीत व आजूबाजूच्या समाजासाठी सौंदर्य व प्रभाव घेऊन येणारी असावीत. २०२० सालापर्यंत ५००,००० कुटुंबांना दर्जेदार घरे व त्याबरोबरीनेच गाण्याचे, संगीताचे क्लासेस, डान्स अकादमी, स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस यासारख्या अनोख्या सुविधादेखील मिळाव्यात हे कर्म इन्फ्रास्ट्रक्चरचे उद्दिष्ट आहे.