मुंबईच्या तालिमची निर्मिती
वेगवेगळ्या नाट्य महोत्सवांत, स्पर्धेत मनाचे पुरस्कार कमावणाऱ्या ‘खिडकी’ या नाटकाचा प्रयोग ११ फेब्रुवारीला मुंबईतील ‘एन.सी.पी.ए. मध्ये सादर होत आहे.
एन.सी.पी.ए.च्या प्रतिबिंब नाट्य महोत्सवात उदंड प्रतिसादा नंतर ‘खिडकी’ या नाटकाचा प्रयोग पुन्हा एकदा नाट्य रसिकांना बघता येणार आहे, एन.सी.पी.ए.च्या गोदरेज नाट्यगृहात शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सायं ७ वाजता.

हे नाटक नोबल पारितोषिक विजेते दारीओ फो यांच्या ‘An Accidental Death Of An Anarchist’ या नाटकावर आधारित आहे. या नाटकासाठी चंद्रशेखर गोखले यांना सर्वोत्कष्ट अभिनयासाठी राज्य शासनाचे रौप्य पदक आणि झी गौरव या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.