सुपरस्टार्स वर्सेस बालकलाकार या संकल्पनेवर आधारलेल्या ‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचा आस्वाद रविवार २८ मे रोजी झी टॉकीजवर दुपारी १२.०० वा. सायंकाळी ७.०० वा. घेता येईल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि बालकलाकार पुष्कर लोणारकर यांनी केले. मानसी नाईकने सादर केलेली गणेशवंदना, भूषण पाटीलचा टपोरी डान्स, मेघा घाडगे यांची बहारदार लावणी, अभिजित आणि प्रसेनजीत कोसंबी यांची सुश्राव्य गाणी, अतुल तोडणकर, आशिष पवार, नम्रता आवटे, मेघना एरंडे यांचे ‘रिएलिटी शो’ हे धमाल स्कीटस् अशा मनोरंजनाच्या पॅकेजने पुरेपूर हा सोहळा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.
‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात सुपरस्टार्स वरचढ ठरले की बालकलाकारांची सरशी झाली हे रविवार २८ मे रोजी दुपारी १२ वा. व सायंकाळी ७ वा. झी टॉकीजवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.