२४ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘माणूस एक माती’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आणि संगीत प्रकाशन सोहळा एका खास समारंभात करण्यात आला.
चित्रपटाच्या नावाप्रमाणे चित्रपटाचा आशयदेखील प्रगल्भ असून, प्रत्येक माणसाची शेवटी माती होते, हे जरी खरं असलं तरी, जर जिवंतपणीच आयुष्याची माती झाली तर? असा सवाल करून या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.
‘शिवम ऐनटरटेंमेंन्ट इंडिया लिमिटेडच्या’, निर्माती शारदा विजयकुमार खरात, सहनिर्माते डॉ. विजयकुमार खरात, दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे हे कायमच आशयघन कलाकृतीला महत्त्व देतात. त्यामुळे ‘माणूस एक माती’सारख्या सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरले आणि लेखक-दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडला आहे. चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांची असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या द्वयींची आहे.
उर्जेचा स्त्रोत असलेल्या सिद्धार्थ जाधवचा ‘बाप अभिनय’ आणि चित्रपटातील त्याचा बाप गणेश यादवचाही ‘बाप अभिनय’ म्हणजे प्रेक्षकांना एक पर्वणी असणार आहे. रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ. विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे यांनीसुद्धा आपापल्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत.
चित्रपटातील गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली असून चित्रपटाला संगीतसुद्धा त्यांनीच दिले आहे. ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शिना अरोरा, पी गणेश यांनी गायली आहेत.
‘आई’ या विषयावर बरचं लिहिलं, बोललं आणि ऐकलं गेलं आहे परंतू बाबाचं, न दिसणारं हळुवार मन अत्यंत सुंदरपणे उलगडत नेणारा ‘माणूस एक माती’ हा एक उच्च निर्मिती मूल्य असलेला कौटुंबिक-सामाजिक चित्रपट आहे. कुटुंब व्यवस्था, नाते संबंध यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल. शिवाय या चित्रपटाचे नाव आपल्याला बरच काही सांगत आहे आणि २४ मार्चला प्रदर्शित झाल्यावर चित्रपटसुद्धा आपल्याला बरचं काही सांगणार आहे !