अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचा उपक्रम
मराठी चित्रपट सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मानाचं स्थान मिळून मराठी चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सबमिशन सेल असे विभाग सुरु केले आहेत.
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाने पुढाकार घेऊन मराठी निर्मात्यांसाठी सिनेमा विकण्यासाठी अजून एक नवीन दालन खुले केले आहे.
या वर्षी ‘कान’ येथे ३ एप्रिल ते ६ एप्रिल २०१७ला भरणाऱ्या ‘कान्स मीप टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत मराठी चित्रपट महामंडळ भाग घेणार आहे. यासाठी या संचालक चैत्राली डोंगरे यांची निवड झाली असून इंटरनॅशनल फिल्म सेलच्या मुख्य व्यवस्थापिका निलकांती पाटेकर यांना कांसला पाठविणार आहे.
कुठल्यातरी इंटरनॅशनल फिल्म मार्केटमध्ये महामंडळ प्रतिमाच आपला सहभाग नोंदविणार असून महामंडळाद्वारे देशोदेशीचे बायर्स यामुळे मराठी निर्मात्यांना उपलब्ध होणार आहे. आताच्या डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या टेरिटरीजसाठी तऱ्हेतऱ्हेचे हक्क विकले जाऊ शकतात. अशा या बाजारपेठांमध्ये निर्मात्यांना आपल्या डॉक्युमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स, फिचर फिल्म्स, म्युजिक व्हिडीओ, अॅनिमेशन फिल्म्सचे सॅटेलाईट, डिजिटल टेरिस्ट्रीअल, डीव्हीडी, एअरलाईन्स, हॉटेल्सचे हक्क विविध देशांना विकता येतात. चित्रपट कितीही जुना असला तरीसुद्धा निर्मात्याकडील त्या चित्रपटाचे हक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर विकण्याचा प्रयत्न करता येतो. त्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा विभाग सुरु केला आहे. त्या द्वारे महत्वाच्या विविध फिल्म मार्केटसमध्ये मराठी चित्रपट विक्रीसाठी नेण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल.
‘कान्स मीप (MIP) टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत चित्रपटांवरील हक्कांच्या विक्रीसाठी इच्छूक असल्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेलमध्ये नोंद करावी.
यासाठी चित्रपटाला इंग्लिश सब टायटल असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात अथवा internationalffsubmission@gmail.com येथे संपर्क साधावा, असे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
खालील साहित्य व फॉरमॅट गरजेचे आहे.
१. संपूर्ण सिनेमा (इंग्लिश सब टायटल) MP4 format
२. फिल्म चा ट्रेलर (MP4 फॉरमॅट)
३. डिजिटल ब्रोशर & पोस्टर
४. वर्किंग स्टील्स
५. सिनोप्सीस (१५० शब्द)
६. प्रोड्यूसर्स नोट फोटो सहित
७. डायरेक्टर्स नोट फोटो सहित
८. फिल्मओग्राफी (प्रोड्युसर & डायरेक्टर)
९. कॅमेरामन नोट
१०. संकलक नोट गरजेचे आहे.
सदर फिल्म मार्केट वर्षभर सुरु असेल, मात्र कान फिल्म मार्केटसाठी शेवटची तारीख २४ मार्च २०१७ पर्यंत मराठी चित्रपट महामंडळ, पहिला मजला, पु ल देशपांडे अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कार्यालयात जमा करावे.
अधिक माहितीसाठी (०२२) २४३०८८७६ या क्रमांकावर संपर्क करावा.