‘शोधलं की सापडतं’ असं म्हणणाऱ्या अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा मार्ग शोधला ‘झुंबा’ या अनोख्या रिदमिक वर्कआऊटमध्ये.
आपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघ हिने या नवीन वर्षी स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट आत्मसात केलंय.
मयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून तिचं हे वर्कआऊट ती खूप एन्जॉय करतेय. आज ‘वर्ल्ड हेल्थ डे’ निमित्त मयुरीने तिच्या चाहत्यांसाठी तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयुरीने तिच्या चाहत्यांना एका अर्थाने इन्स्पायरच केले आहे, कारण एका फन वर्कआऊट मधून देखील आपण फिट आणि हेल्थी होऊ शकतो हे या व्हिडीओतून मयुरीने दाखवून दिले आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे झुंबा मूव्हज नक्कीच आवडतील यात शंकाच नाही.