कौटुंबिक पार्श्वभूमीवर कॉमेडी झलक
राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतो आहे.
दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केले आहे. कॉमेडी शैलीची झलक व कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित असून प्रेक्षकांना ह्या सिनेमात मनोरंजनाचा मसाला पहावयास मिळणार आहे.
चित्रपटांतील कलाकार आहेत अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोघे, पदम सिंग, स्वाती व इतर. निर्माता आहेत प्रदिप के. शर्मा व दिपक रुईया. चित्रपटांत एकूण चार गाणी आहेत. एवढचं काय तर मीरा जोशीवर धमाकेदार आयटम सांग चित्रित केले आहे.
चित्रिकरण भोर व मुंबईमध्ये फिल्मसिटी येथे करण्यात आले आहे. चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण होताच सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.