महिलांचे सशक्तीकरण हा उद्देश असलेले पिंकथॉन आता ठाण्यातदेखील आयोजित करण्यात आले आहे आणि त्यामध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी या दिग्गजांसोबत मिताली ही आजच्या युथचे प्रतिनिधित्व करणार आहे.
बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मिताली मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस आली पण आता ठाणेकरांना मिताली एका वेगळ्या माध्यमातून भेटणार आहे.
बाळकूम ठाणे येथे १९ मार्चला होणाऱ्या पिंकथॉनमध्ये मिताली असणार आहे.
पिंकथॉनसाठी उत्सुक असलेल्या मितालीने मिलिंद सोमण आणि सोनाली कुलकर्णी सोबतचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पिंकथॉनमध्ये ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहनदेखील मितालीने केले.