‘चि. व चि.सौ.कां.’साठी खास प्रशिक्षण
आगामी ‘चि. व चि.सौ.कां.’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने या चित्रपटासाठी ‘कुंग फू’चे प्रशिक्षण घेतले. ‘चि. व चि.सौ.कां.’ या चित्रपटातून प्रेक्षक मृण्मयीला मोठ्या पडद्यावर ‘कुंग फू’ करताना पाहू शकतील.
मृण्मयी तिच्या ‘कुंग फू’ प्रशिक्षणाबद्दल सांगते, ‘मी या आधी कलरीपयट्टू शिकली आहे आणि १० वर्ष मी बास्केटबॉलसुद्धा राष्ट्रीय पातळीवरही खेळली आहे; पण मी या आधी ‘कुंग फू’ कधीच शिकली नव्हती. चित्रपटाच्या शूटिंगच्या १ महिना आधी मला आणि ललितला ‘कुंग फू’चे प्रशिक्षण देण्यात आले. मी चित्रपटात ‘कुंग फू ब्लू’ बेल्ट असलेल्या मुलीचं पात्र साकारलंय. जरी मी ट्रेनिंग सेशन्स उशिरा चालू केले तरी मी खूप मेहनत आणि प्रॅक्टिस करून ‘कुंग फू’ शिकली आणि त्यात मला माझ्या कलरीपयट्टू आणि बास्केटबॉल ट्रेनिंगची खूप मदत झाली. आमचे ट्रेनर श्रीकांत सर यांनी खूप सक्त ट्रेनिंग देऊन आमच्याकडून कठीण व्यायाम व स्ट्रेचिंग करून घेतले. मला असं वाटतंय मी एका महिन्यात वर्षभराचं ‘कुंग फू’ शिकलेय. कुंग फू शिकण्याची प्रक्रिया खूप कडक आणि थकवणारी होती, पण त्याची
चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्हाला खूप मदत झाली. मला आणि ललितला दुखापतही झाली आणि आम्ही एकमेकांना मारलं देखील; पण ते जाणीवपूर्वक नव्हतं, तो चित्रीकरणाचा भाग होता.’