जगदगुरू शंकराचार्य नँशनल अवार्ड
नँशनल एज्युकेशन सोसायटी (एन.ई.एस) आणि सरस्वती विद्या भवन (एस.व्हि.बी) या संस्थाचा १६वा एन.ई.एस जगदगुरू शंकराचार्य नँशनल एमिनंस अवार्ड व नँशनल अवार्ड आणि एन.ई.एस आदि शंकर अवार्ड सोहळा शण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. हा सोहळा जगद्गृरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वथी स्वामी यांच्या उपस्थित झाला.
दर वर्षी हे अवार्ड शिक्षण, प्रसारमाध्यमे, समाज आणि संस्कृती अश्या विविध क्षेत्रातील व्यक्तीना दिले जातात. राहुल शेवाळे, संसद सदस्य, अभिनेत्री मधु शाह (रोजा फेम), सुरेश वाडकर, जेष्ठ संगीत रचनाकार आणि गायक असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वर्षी ३ श्रेणीचे पुरस्कार देण्यात आले. राहुल शेवाळे आणि जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना एन.ई.एस आदी शंकर हा पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर पी एस के मुथूरामलिंगम यांना सामाजिक कार्यकर्तेसाठी पुरस्कार मिळाला. नँशनल एज्युकेशन सोसायटी (एन.ई.एस) आणि सरस्वती विद्या भवन(एस.व्हि.बी) या वर्षी या संस्थेला ५५ वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा केला. एन.ई.एस आणि एस.व्हि.बी संस्थाचे संस्थापक डॉ.आर.वर्दराजन यांना जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.