नृत्यकला निकेतन संस्थेची संकल्पना
नृत्यकला निकेतन ही शास्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था गेली ३५वर्षे गिरगावात सातत्याने गुरु अर्चना पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य संवर्धनाचे काम करीत आहे. याच संस्थेतर्फे जागतिक नृत्य दिनानिमित्त शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सायं.७ वा. साहित्य संघ मंदीर; गिरगाव येथे मनोरंजन क्षेत्रातील ५ मान्यवरांचा सन्मान जयंत सावरकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून यामध्ये दिप्ती भागवत (अभिनय आणि निवेदन), वैशाली माडे (गायन), रत्नप्रभा ताटे (नृत्य), नरेंद्र. पंडित (नृत्यदिग्दर्शन), अशोक वायंगणकर ( संगीत संयोजन) यांचा समावेश आहे.
या सन्मान सोहळ्यादरम्यान संस्थेच्या विद्यार्थिनी नृत्याविष्कार सादर करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सौ. मयुरी खरात यांचे असून मार्गदर्शन संचालिका गुरु अर्चना पालेकर यांचे आहे.
१४ एप्रिल रोजी चेन्नई पल्लवरम वेल्स युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात ५००० भरतनाट्यम नर्तक आणि नर्तिकानी एकत्र नृत्य सादरिकरणाचा गिनीज रेकॉर्ड यशस्वीरीत्या पूर्ण केला. या रेकॉर्ड साठी अतिश्त बालन ह्यांची पूर्ण संकल्पना होती. त्यानी स्वत: नृत्य सादर केले तसेच नृत्यदिग्दर्शनही त्यांचेच होते. ह्या सादरीकरणात नृत्यकला निकेतनच्या ६५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. ह्या सर्वाना प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यासाठी श्री. बालन स्वत: २९ एप्रिलच्या” नृत्यकला निकेतन” च्या वार्षिक स्नेह समेलनासठी विशेष अतिथी म्हणून साहित्य संघ मंदिरात हजर रहाणार आहेत.
गिनीज रेकॉर्डच्या सादरीकरणात मुंबईतून ही एकमेव संस्था गुरु अर्चना पालेकर आणि मयुरी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाली होती.