प्रवीण कुवर यांचे संगीत दिग्दर्शन
कोळी वाड्याची शान आणि बानूबया या गाण्यांनी संगीतरसिकांना वेड लावणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर आता ‘ओढ’ या चित्रपटातील गाण्यांद्वारे रसिकमने जिंकण्यास सज्ज झाले आहेत.
प्रवीण कुवर यांनी आजवर विविध गाण्यांवर श्रोत्यांना नाचायला लावलं आहे. मराठीबरोबरच हिंदी आणि इतर भाषांमध्येही उत्तम गाणी तयार केली आहेत. पोलीस लाईन, बुगडी माझी सांडली ग, भुताचा हनिमून, प्रेम कहानी, धमक अशा बऱ्याच चित्रपटांमधली त्यांची गाणी गाजली आहेत. या कोळी वाड्याची शान आणि बानूबया या गाण्यांनी लोकांना वेड लावल आहे. आता पुन्हा एकदा ‘ओढ’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या संगीतातील वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल (निरंतर राहू दे हृदयात तू ) हे गणपतीचं गाणं गाणार आहेत आणि रोहित राऊत आणि आनंदी जोशी (लागली तुझी ओढ) हे यांचं एक प्रेमगीत आहे. यातील गाणी संजाली रोडे आणि अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत.
स्वप्नील बांदोडकर म्हणतात की, प्रवीणसाठी गाण्याचा अनुभव नेहमीच उत्साहपूर्ण असतो. गाण्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. नेहा म्हणते की हे गणपती बाप्पाचं गाणं आहे, त्यामुळे हे गाणं गाताना मला बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटलं तर रोहित आणि आनंदी म्हणतात की हे प्रेमगीत गाताना आम्ही खूप धमाल केली. हे गाणं गाण्याचा अनुभव खूप छान होता. आणि या प्रोसेसमध्ये आम्ही खूप वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटाचे निर्माते आहेत एस. आर. तोवर आणि दिग्दर्शक दिनेश ठाकूर. भाऊ कदम, उल्का गुप्ता आणि मोहन जोशी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.