ठाण्यात १६ जुलैला कार्यक्रम
भारतीय अभिजात संगीतातील ज्येष्ठ गायक, नायक व गुरु पंडित सी.आर. व्यास यांना त्यांचे कुटुंबीय व शिष्य मिळून येत्या १६ जुलैला सांगीतिक मानवंदना देणार आहेत. हा कार्यक्रम सी के पी सभागृह खारकर गल्ली, ठाणे येथे सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५ ते १० अशा दो सत्रामध्ये होणार आहे.
पंडित सी.आर. व्यास यांनी अनेक मैफिली गाजवणारे, अनेक बंदिशी करणारे श्रेष्ठ रचनाकार व अनेक शिष्य तयार केले. ते सर्व शिष्य आज अनेक मैफिली भारतात व परदेशात रसिकांची दाद घेतात. पंडितजींनी गुनिजान या टोपणनावाने अनेक बंदिशींची निर्मिती केली. धनकोनी कल्याण, शिव-अभोगी, अहिरावती, सुधजोगिया, सुधरंजनी अशा अनेक रागांची निर्मिती केली.
ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमात सकाळच्या सत्रामध्ये केदार केळकर, नेहा गुरव, आदित्य व्यास, नेहा चिम्मलगी, संजीव चिम्मलगी यांचे गायन व पंडितजींचे सुपुत्र प्रसिद्ध संतूरवादक सतीश व्यास यांचे संतूरवादन होईल.
सायंकाळच्या सत्रात चिन्मय दीक्षित, शुभांगी जोशी, आनंद बेंद्रे, अपर्णा केळकर, श्रीपती हेगडेव पंडितजींचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य सुहास व्यास यांच्या गायनाने सांगता होईल. या सर्व कलाकारांना मुकुंदराज देव, महेश कानोले, रूपक खरवंडीकर, पुष्कर महाजन हे तबला साथ करतील व निरंजन लेले व अभिषेक काठे संवादिनीची साथ करतील. कार्यक्रमाचे निवेदन अस्मिता पांडे करतील.