‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात   

‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात   

प्रमोद पवार यांच्या दिग्दर्शनात नवा नाट्यानुभव 

नेहरू सेंटरच्या २० व्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये, २० सप्टेंबरला, संगीत हमीदाबाईची कोठी या नाटकाचा प्रयोग सादर झाल्यानंतर आता या नाटलाच प्रयोग रविवारी (९ ऑक्टोबर) रात्री ९.३० वाजता पुण्यातील भारत नाट्य मंदिरमध्ये होणार आहे. 
img-20161003-wa0026नेहरू सेंटरच्या प्रयोगाला लताफत काझी यांचे मार्गदर्शन होतं. या पूर्वी या नाटकाचे दिग्दर्शन विजया मेहता यांनी यशस्वीपणे केले होते.  नाना पाटेकर, अशोक सराफ, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी यासारख्या दिग्गज कलाकारांनी गाजवलेले हे नाटक. पण ४० वर्षानंतर या नाटकाचा पुनरुजीवन करताना दिग्दर्शकीय अंगाने प्रमोद पवार यांनी वेगळा विचार मांडला आहे. आत्ताच्या प्रेक्षकांना कोठी आणि त्यावर चालणारे नाच-गाणे याचा फक्त ऐकीव परिचय आहे. तो प्रत्यक्ष दाखवून पुढे नाटक सादर केल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत या नाटकातली वेदना जास्त तीव्रपणे पोहोचते.  
या नाटकामध्ये आपल्या तत्वांसाठी, निष्ठेसाठी कुठलीही तडजोड न करता आयुष्य वेचणाऱ्या हमीदाबाईची आणि तिच्या मुलीची कथा चित्रित केलेली आहे. अनेक दिग्गजांनी केलेल्या या नाटकाचे नव्याने सादरीकरण करताना प्रत्यक्ष गायक कलावंत आणि वादक कलावंत घेऊन संगीत नाटक म्हणून सादर केलेले आहे. 
आजच्या कलाकारांपुढे नाटक, सिनेमा, मालिका अशी वेवधानं असताना सच्च्या कलाकाराची आपल्या कलेवरील निष्ठा ह्याची वानवा दिसते. समाजात हरवत चाललेली मूल्ये या विषयी अतिशय महत्वाची भूमिका मांडणारे हे नाटक, ४० वर्ष जुने जरी असले तरी आजच्या काळात हे अतिशय महत्वाचे ठरते.   
आपल्या संगीतावरील निष्ठेशी एक रूप राहणारी हमीदाबाई आजूबाजूच्या बदलत्या वातावरणात स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता, फिल्मची नाचगाणी आपल्या कोठीवर होऊ देत नाही. आपल्यासारखे आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून लहानपणापासून हासटेलवर ठेवलेली शब्बो अचानक कोठीवर येते आणि सुरु होते एक विदारक गोष्ट… हमीदाबाईचं नेमका काय होतं?? लहानपणापासून मुसलमान असूनही संकष्टी पाळणारी शब्बो वेश्या वस्तीत आल्यावर कशी जगू शकेल? पूर्वी ज्या ठिकाणी सुरांची पूजा व्हायची तिथे आज शरीराचा व्यापार करणारे, निष्ठेने काम करणाऱ्या सच्च्या कलाकाराला जगू देतील? या  आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे नाटक पाहणे महत्वाचे आहे. 
हमीदाबाईची कोठी (मध्यंतरासहित 3 तास )   
लेखन: अनिल बर्वे   
दिग्दर्शन : प्रमोद पवार   
कलाकार: सरिता भावे , मीरा जगन्नाथ, अधीश पायगुडे, दीप्ती भागवत आणि सतीश सलागरे   
निर्मिती : नेहरू सेंटर, 
सहयोग : अमृतकुंभ प्रतिष्ठान,
प्रस्तुती : राजा पायगुडे  
आगामी प्रयोग 
रविवारी दि. ०९/१०/२०१६ 
वेळ : रात्री ९.३० वा. 
स्थळ : भारत नाट्य मंदिर, पुणे

Most Recent Entries

सर्व अधिकार राखीव © २०२३ रंगमैत्र