११ डिसेंबरपासून व्यंगचित्र प्रदर्शन
विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशन, लालित्य फाउंडेशन आणि आर्टिस्टर तर्फे ११ ते १३ डिसेंबरदरम्यान ‘रा
नागपूर हिवाळी अधिवेशन काळात आयोजित हे व्यंगचित्र प्रदर्शन वर्तमान राजकारण भाष्य करणारे, विदर्भातील शेतकरी आत्यहत्या आणि महाराष्ट्र व देशभरातील बदलत्या राजकीय घडामोडी दर्शविणार आहे. या उपक्रमात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशातील नामवंत व्यंगचित्रकार सहभागी होणार आहेत. सामान्य माणसाच्या समस्येला वाचा फोडणारे विषय या निमित्याने प्रेषकांना बघायला मिळणार आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन विदर्भवादी नेते ऍड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते ११ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथील राजा रवी वर्मा आर्ट गैलरीत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदेश सिंघलकर, अत्तादीप रामटेके, सुदर्शन पाटील, संजय तिवारी आदी उपस्थित राहतील. प्रेक्षकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य १३ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्व आमदार, लोकप्रतिनिधी व रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संजय मोरे, उमेश चारोळे, प्रसाद पिंपरीकर, सुरेश रहांगडे प्रयत्न करीत आहेत.