‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मध्ये असेही वर्चस्व
मराठी चित्रपट सृष्टीला ग्लॅमर देणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरला २०१७ च्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात तीन नामांकन जाहीर झाली आहेत. फेवरेट अभिनेत्री (जाऊंद्याना बाळासाहेब) तर सहायक अभिनेत्री (फॅमिली कट्टा) इतकंच नव्हे तर ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इअर’साठीदेखील सईला नामांकन मिळाले आहे.
सई मराठी सिनेसृष्टीत अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात ती वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासोबत नुकतेच मराठी चित्रपटांना इफिसारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवलमध्ये दर्शवण्याचा मान सईला मिळाला.
२०१७ मध्येही तिने छोट्या छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे वेगळेपण लोकांपर्यंत पोहचवले. ‘जाऊंद्या बाळासाहेब’मधली करिष्माची भूमिका असो किंवा ‘फॅमिली कट्टा’मधली मंजू असो. सई ह्या भूमिकांसाठी लोकांच्या लक्षात राहिली.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मध्ये तीन नामांकने मिळ्याल्याबद्दल सईला विशेष आनंद आहे. या नामांकांतून तिने भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते तर भूमिकेला योग्य न्याय देणे महत्त्वाचे असते, हे सिद्ध करून दाखविले आहे.