एक वर्षापूर्वी सैराट नावाचं एक वादळ आलं होतं. सैराटने फक्त व्यावसायिक समीकरणं बदलली नसून मनोरंजनाच्या सर्वच कक्षा या सिनेमाने पार केल्या होत्या. वर्षभर लोकांमध्ये फक्त याच सिनेमाची चर्चा सुरु होती. अशा या सैराट सिनेमाला कॅफेमराठीने एका अनोख्या पद्धतीने ग्रॅंड सॅल्युट दिला आहे. कॅफेमराठी युटयूब चॅनलवर सैराट वन ईयर स्पेशल ट्रिब्युट या नावाने दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओला पसंती मिळाली आहे.
कॅफेमराठीचे निर्माते निखील रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांच्या संकल्पनेतून आणि लिखाणातून साकारलेला हा व्हिडीओ दत्ता भंडारे या तरुणाने दिग्दर्शित केला आहे. कॅफेमराठी बिंदास बोल या सिरीजमध्ये या व्हिडीओचा समावेश असून तरुणांची आवडती भक्ती पठारे हि निवेदकाच्या भूमिकेत आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे यात मराठी भाषेच्या अनेक लहेजांचा चपखल वापर करण्यात आला आहे, त्यामुळे सर्वच महारष्ट्रातून याला पसंती मिळत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात काम करणारे सर्वच कलाकार हे नवोदित असून ते मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, धुळे, नागपूर, अकोला, कोल्हापूर, सांगली या भागातले आहेत. सर्वानीच पहिल्यांदाच कॅमेराचा सामना केला आहे. व्हिडीओचे छायांकन लक्ष्मण खरात याने केले असून व्हिडीओमध्ये कल्पेश पाटील, शेखर कडू, विजय पवार, रोहित खांडरे, नागेश साळवी, किरण तांबे, प्राज्वली नाईक, पूनम चव्हाण, लीना पाटकर, श्रुतिका तरडे, पूजा परब आणि अश्मिता दोरकुलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लिंक –https://goo.gl/ZuNeZ2