१८ ते २४ मार्चदरम्यान ‘सत्यमेव जयते’
‘फक्त मराठी’ चित्रपट वाहिनीने पोलिसांच्या पराक्रमी कथांवर आधारित धमाकेदार मराठी चित्रपटांचा नजराणा ‘सत्यमेव जयते’मध्ये आणला आहे. ‘फक्त मराठी’ वर १८ मार्च ते २४ मार्च या कालावधीत दररोज रात्री ७:३० वा. प्रेक्षकांना हे चित्रपट पहाता येणार आहेत.
‘सत्यमेव जयते’मध्ये ‘मेड इन महाराष्ट्र’, ‘खतरनाक’, ‘पोलिसाची बायको’, ‘फौजदार ज्योतिबा सावंत’, ‘जिवा सखा’, ‘सहा सप्टेंबर’ आणि ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘फक्त मराठी’ नेहमीच नव्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करीत असते. ‘सत्यमेव जयते’देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.