‘तुझं तू माझं मी’ १६ जुनला प्रदर्शित होणार
ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे ‘टीटीएमएम’ अर्थात ‘तुझं तू माझं मी’ या आगामी चित्रपटात ललित प्रभाकरच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सविता प्रभुणे या मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील पॉप्युलर आणि सर्वांची लाडकी स्क्रीन-मदर आहे. सविता प्रभुणे यांनी अनेक मराठी वहिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रेमळ आणि मायाळू आईची भूमिका निभावली आहे. एका हळव्या आणि गोड आईच्या भूमिकेला अत्यंत साजेश्या असणाऱ्या सविता प्रभुणे यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने सर्वांच्या मनात घर केलं आहे.
सविता प्रभुणे आणि ललित प्रभाकर हे पहिल्यांदाच आई आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे प्रेक्षक देखील मोठ्या पडद्यावरील या आई-मुलाची बॉण्डिंग आणि केमिस्ट्री एन्जॉय करतील यात शंका नाही. ‘टीटीएमएम’ हा चित्रपट येत्या १६ जुनला प्रदर्शित होणार आहे.