झी युवा वाहिनीवरील ‘श्रावणबाळ रॉक स्टार’ या मालिकेच्या सेटवर दिवाळी सेलेब्रेशन झाले. यावेळी सर्वच कलाकारांचे नवनवे कलागुण प्रदर्शित झाले.
केतकी म्हणजेच कामिनी उत्तम गायिकाही असल्याचे या सेलिब्रेशनमध्ये अधोरेखित झाले. सेटवर तिने या गायकीचा एक धागा विणला. संचिता म्हणजेच नितु उत्तम मिमिक्रीही करते. तिने डोरेमॉन नामक कार्टूनमधील नोबेतो या केरेक्टरचा हुबेहूब आवाज काढत सर्वाना दिवाळीच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या सेलेब्रेशनमध्ये मालिकेतील नीरज गोस्वामी, केतकी पालव, संचित कुलकर्णी, राजेश देशपांडे , सुप्रिया विनोद, आशिष कापिसकर, पार्थ घाटगे आणि जयवंत वाडकर हे सर्वच कलाकार उपस्थित होते.
झी युवाच्या या सर्व कलाकारांनी इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचं आवाहन केलं आहे. ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ ही मालिका ‘झी युवा’ वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज ७:३० वाजता प्रसारित होते.