शोमधील टीमला पुण्यात देणार पार्टी
कलर्स मराठीवरील ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मधील परीक्षक सोनाली कुलकर्णीला या शोच्या कलाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिलं, ज्यामुळे सोनालीला आश्चर्यचकित झाली.
महाराष्ट्राची लाडकी, देखणी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यामध्ये ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ परिवाराचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे.
सोनालीचा वाढदिवस १८ मे रोजी असतो पण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’च्या संपूर्ण टीमने तिला सरप्राईझ दिलं. सेटवर तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. तिचा वाढदिवस नक्कीच या टीमने खूप खास बनविला.
यावर बोलताना सोनाली म्हणाली, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचा मी आता सहा महिन्यांपासून भाग आहे. जणू हा माझा परिवारच आहे. माझ्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’च्या सेटवर येणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते, जसा प्रत्येकासाठी रविवार असतो तसंच काहीसं माझ्यासाठी इथे या मंचावर येणं असतं. मला खूप मोठ सरप्राईज होत हे कि, माझा वाढदिवस इतक्या सुंदरप्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला. या मंचावर येऊन मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या – छोट्या अडचणीमधूनदेखील आनंद कसा शोधावा, हे कळालं, तसेच विनोदाचे कौतुक करण्याची माझी कुवत वाढली, असे मी म्हणेन”.
‘माझ्या वाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांदेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार आहे.’ आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली संपूर्ण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’च्या टीमला पुण्यामध्ये पार्टी देणार आहे.