समन्वय प्रतिष्ठानचे आयोजन
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सौंदर्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. सुहाना मिस व मिसेस ठाणे, दिवा फॉर एवर व नन्ही परी कॅट वॉक स्पर्धा यांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. `सुहाना मिस ठाणे’ या स्पर्धेत १४ व `सुहाना मिसेस ठाणे’ या स्पर्धेत २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री सारा श्रवण उपस्थित होत्या तर, कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सतीश रेड्डी, निना सिंग, प्रिया भूमकर, सोनिया प्रबोध डावखरे, मेधा मेहेंदळे यानी काम पाहिले.
सुहाना मिस ठाणे २०१७ ची विजेती म्हणून तेजस्विनी तुपसाखरे, द्वितीय क्रमांक दिप्ती मोरे, तर तृतीय क्रमांक सिध्दी धामनस्कर व सुहाना मिसेस ठाणे २०१७ ची विजेती म्हणून प्रियांका शिंदे, आरती ताकले, मयुरी विंगुलकर याना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. सुहाना सुंदर चेहरा म्हणून वेल्लरी जोशी व श्रृती नारडोला यांची निवड झाली. व्यक्तीमत्व व बौध्दीक चाचणी स्पर्धेत स्वाती सोनी व आफरिन शेख यांची निवड करण्यात आली.
सौंदर्य स्पर्धा ही केवळ निवडकांची मक्तेदारी नाहे, केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा तुमचे व्यक्तीमत्व, बौध्दीक क्षमता, निर्णय क्षमता यांच्या जोरावर सौंदर्य स्पर्धा जिंकता येऊ शकते. समन्वयच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील मिस व मिसेस़ना सौंदर्य स्पर्धेत चमकण्याची आणि आपले कतृत्व दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती आयोजिका नीलिमा निरंजन डावखरे यांनी दिली.