‘कलर्स मराठी’वरील मालिकेत साकारणार माया
शारदाने सर्जासाठी माया नावाची मुलगी जानकीच्या मदतीने पसंत केली असून, मायाचा रोल स्वप्नाली पाटील साकारणार आहे. बऱ्याच दिवसांनंतर स्वप्नाली ‘कलर्स मराठी’वरील चाहूल मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य शांभवी आणि सर्जाला कळता कळता राहून गेले आणि पुन्हा एकदा शांभवी निर्मलाच्या जाळ्यात अडकली. या सगळ्या घटना होत असतानाच शारदा म्हणजे सर्जाच्या आईला त्याच्या लग्नाची घाई लागली आहे, तिने सर्जासाठी मुली बघायला सुरुवातदेखील केली आहे. त्यामुळे निर्मला प्रंचड संतापली आहे. कारण पहिले जेनी, नंतर शांभवी आणि आता कोण ही नवीन हा प्रश्न तिला सतत त्रास देतो आहे. सर्जाच्या आत्याने जानकीने मायाला पसंत केले आहे. पण खरतर माया ही struggler artists आहे, आणि जे जानकीला माहिती आहे. आता प्रश्न हा पडतो कि, जानकी आणि मायाच या सगळ्यामध्ये काय कारस्थान आहे? माया नामक मुलगी खास मुंबईहून सर्जाला भेटण्यासाठी आली आहे. कारण तिचं अअसं मत आहे कि, ज्या मुलाशी ती लग्न करणार आहे त्याला भेटल्याशिवाय कसं काय हो म्हणायचं आणि याबरोबरच त्याच्या कुटुंबांला भेटणेदेखील तितकच महत्वाचं आहे असे तिला वाटते.
माया सर्जाला भेटते त्याच्या कुटुंबालादेखील भेटते आणि भोसले वाड्यात रहायलादेखील लागते. पण हळूहळू शांभवीला मात्र कुठेतरी त्यांच्यातील मैत्री खटकू लागते. शांभवीला असं का होत आहे हे तिला नेमक काही कळत नाही. शांभवीला प्रेमाची चाहूल लागली आहे पण याची जाणीव तिला कधी होईल? हे बघणे रंजक ठरेल.
जानकी आणि मायाच काय कारस्थान आहे? हे कारस्थान निर्मला किंवा शांभवीपर्यंत पोहचेल का? सर्जाच्या मनामध्ये नक्की काय आहे? निर्मला आता माया आणि सर्जाला दूर करण्यासाठी काय करेल? शांभवीला सर्जाबद्दल प्रेम वाटू लागले आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी बघा चाहूल २८ मे ते ३ जून ‘कलर्स मराठी’वर रात्री १०.३० वा.