पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या जादूची मैफल
‘स्वरयात्रा’ शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ‘धरोहर’ या आगळ्यावेगळ्या मैफिलीत एकत्र आणत आहेत. या मैफिलीत अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी (गायन), पंडित पुष्पराज कोष्टी (सूरबहार) आणि एस. बालचंदर (चंद्रवीणा) हे कलाकार सहभागी होत आहेत. ही मैफिल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (मिनी थिएटर), रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ५ मार्च २०१७ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरु होईल.
‘स्वरयात्रा’ गेल्या ५ वर्षांपासून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील सध्याच्या घडीला असलेल्या दिग्गज कलाकारांना बैठक या सादरीकरणाच्या माध्यमातून एकत्र आणत आहेत.
मैफिलीचे दोन सत्र असतील. सत्र १ मध्ये अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी (सहगायन) यांचे गायन होईल व त्यांना पंडित नयन घोष (तबला) आणि संगीत मिश्रा (सारंगी) यांची साथ असेल. सत्र २ मध्ये पंडित पुष्पराज कोष्टी यांचे अत्यंत दुर्मिळ अशा सूरबहार आणि एस. बालचंदर यांचे चंद्रवीणाचे (सहवादन) होईल व त्यांना पंडित उध्दवराव आपेगावकर पखावज वर साथ देतील.
या सर्व कलाकारांनी भारतभरात आपल्या सादरीकरणाने रसिकांना भुरळ पाडत शास्त्रीय संगीत क्षेत्रात दिग्गज कलाकारांचे स्थान पटकावले आहे.
स्वरयात्राचे संचालक मनोज मंडलीकर म्हणाले की, ‘गेल्या पाच वर्षांपासून आम्ही स्वरयात्रेच्या माध्यमातून कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर्षी निवडण्यात आलेला प्रत्येक कलाकाराची कला सादर करण्याची आपली एक वेगळी पध्दत आहे. जेव्हा हे सर्व कलाकार एकाच व्यासपीठावर एकत्र येतील तेव्हा त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातील.’
ते पुढे म्हणाले की, ‘सभागृह सादरीकरण अर्थात निवडक रसिकांपुढे संगीत सादरीकरण कलाकार आणि रसिकांमध्ये चांगले बंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांपुढे वेगवेगळ्या कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि संगीत बैठकीच्या सादरीकरणातून जिवंत ठेवण्याची ही प्रक्रिया माझ्यासाठी खूपच समाधानकारक आहे.’
कलाकार
अपूर्वा गोखले :दिग्गज संगीतकारांच्या घराण्यात जन्माला आलेल्या अपूर्वा गोखले यांनी ग्वाल्हेर घराणाच्या पक्क्या बैठकीतून नवोदित गायकांतील आश्वासक आणि प्रसिध्द गायिका म्हणून ख्याती मिळवली आहे. पाच वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांना आजोबा पंडित गजाननराव जोशी यांच्याकडून प्रशिक्षणास सुरुवात झाली, त्यानंतर गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रसिध्द गायक आणि व्हायोलीनवादक काका पंडित मधूकर जोशी यांच्याकडून १५ वर्षांहून अधिक काळ प्रशिक्षण घेतले. त्याचवेळी डॉ. सुचेता बिडकर आणि वडील मनोहर जोशी आणि त्याच परंपरेतील पं. उल्हास कशाळकर यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. पुढील संगीत शिक्षण त्यांनी पंडित शंकर अभ्यंकर, माणिक भिडे, अश्विन भिडे-देशपांडे, पं. यशवंत महाले आणि पं. अरुण कशाळकर यांच्याकडे घेतले.
पल्लवी जोशी
दिग्गज संगीतकारांच्या घरात जन्माला आलेल्या पल्लवी यांना संगीत वारसाहक्कानेच मिळाले आहे, त्यांच्या कुटुंबाच्या पाचव्या पिढीचे त्या प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे संगीत प्रशिक्षण वयाच्या ५ व्या वर्षी प्रसिध्द व्हायोलीनवादक आणि गायक आजोबा पंडित गजाननबुवा जोशी यांच्याकडे सुरु झाले. त्यानंतर २५ वर्षांहून अधिक त्यांचे काका पं. मधूकर जोशी यांच्याकडे त्यांनी गुरु-शिष्य परंपरेनुसार प्रशिक्षणाला सुरुवात केली, ज्यात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात केली. वडिल मनोहर जोशी, डॉ. सुचेता बिडकर आणि पं. अरुण कशाळकर यांचेही त्यांना मार्गदर्शन होते. भारत सरकारच्या तरुण हिंदूस्थानी शास्त्रीय गायकीसाठी दिली जाणारी शिष्यवृत्तीने त्यांचा गौरविण्यात आले आहे.
पंडित पुष्पराज कोष्टी : संगीतकारांच्या कुटुंबात जन्मलेले पंडित पुष्पराज कोष्टी सूरबहार वाजविण्यास प्रसिध्द असलेल्या डगर वाणी घराण्याशी संबंधित आहेत. त्यांनी सुरुवातीचे संगीत प्रशिक्षण सितारमध्ये त्यांचे वडिल आणि ग्वाल्हेरचे उत्सादन हाफिज अली खान यांचे शिष्य स्वर्गवासी रामलाल कोष्टी यांच्याकडे घेतले. त्यांच्या वडिलांच्या अकाली निधनाने त्यांच्या संगीतसाधनेत काहीसा खंड पडला. पण, त्यांचा गुरुंचा शोध खऱ्या अर्थाने संपला जेव्हा ते प्रसिध्द वीणावादक उस्ताद झिया मोहिनुद्दीन डागर यांच्या संपर्कात आले, त्यांच्याकडून १५ वर्षांपर्यंत पं. कोष्टी यांनी प्रशिक्षण घेतले. आकाशवाणीचे सितार आणि सूरबहार या वाद्यासाठी ते अ दर्जाचे कलाकार असून त्यांनी भारतातील सर्व केंद्रांवर वादन केले, त्यात राष्ट्रीय कार्यक्रम आणि संगीत संमेलनाचा समावेश आहे.
पंडित एस. बालचंदर : पंडित एस. बालचंदर हे वादक डागर वाणी स्कूल ऑफ ध्रुपदशी संबंधित असून, प्रसिध्द गायक आणि ‘चंद्रवीणा’, सरस्वती वीणा ध्रुपद आलाप सादर करण्यासाठी आवश्यक अनुनाद, भरीवपणा आणि ध्वनी निर्माण करण्यास सक्षम असलेल्या वाद्याचे संस्थापक उस्ताद झिया फरीदुद्दीन डागर यांचे शिष्य आहेत. त्यांची कर्नाटकी आणि हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असून सादरीकरणादरम्यान दोन्ही संगीताचे अप्रतिम मिश्रण ते करतात.
प्रवेशिका www.ticketees.com या संकेतस्थळावर उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९६९९०३६९००