प्रसिद्ध निर्माते ‘नितीन मनमोहन’ फ्रेश चेहऱ्यांच्या शोधात
गुणवत्तेचं नाणं कितीही खणखणीत असलं, तरी त्याला संधी मिळणं आवश्यक असतं. अभिनय क्षेत्र, ग्लॅमरची दुनिया, मराठी- हिंदी चित्रपटसृष्टी गाजवण्याचं टॅलेंट आपल्याकडे आहे असं वाटत असेल, तर ते प्रकाशझोतात आणण्यासाठी लागणारी संधी देण्यासाठी ‘वन-अप एंटरटेनमेंट’ ही प्रतिष्ठित निर्मिती संस्था सज्ज झाली आहे.
बॉलिवुडमधील ‘दस’, ‘बागी’, ‘दीवानगी’, ‘लाडला’, ‘बोल राधा बोल’, ‘भूत’, ‘यमला पगला दिवाना’, ‘शूल’, ‘रेडी’ अशा सुपरहिट सिनेमांचे यशस्वी निर्माते, ‘वन-अप एंटरटेनमेंट’ चे नितिन मनमोहन मराठी सिनेमा इंडस्ट्रीत पर्दापण करणार असून त्यासाठी ते नव्या, फ्रेश चेहऱ्यांच्या शोधात आहेत.
गेल्या काही वर्षांत मराठी इंडस्ट्री अशा काही वेगाने विकसित झाली आहे, की आता थेट बॉलिवुडनंही तिची दखल घ्यायला सुरुवात केली. मराठी शोजमध्ये आघाडीचे, प्रख्यात बॉलिवूड स्टार्स लावत असलेली हजेरी हे त्याचंच द्योतक आहे. ‘सैराट’सारख्या सिनेमानं तर हिंदी सिनेमांना तोडीची टक्कर देत कोट्यवधींचा गल्ला तर कमावलाच, पण तुफान लोकप्रियताही मिळवली. एकीकडे मराठी सिनेमांमध्ये नवनवीन विषय, दमदार स्टारकास्ट, संगीत- दिग्दर्शनातले अभिनव प्रयोग पाहायला मिळत असतानाच, त्यांची गुणवत्ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बॉलिवुडमधील निर्मिती संस्था मराठी सिनेमांची निर्मिती करायला लागल्या आहेत. अक्षय कुमारपासून प्रियांका चोप्रापर्यंत मोठमोठे स्टार्स मराठी सिनेमांची निर्मिती करत आहेत, तर शाहरूख खानसारखा बॉलिवुडचा राजाही मराठी सिनेमाची निर्मिती करण्यासाठी उत्सुक आहे. याच धर्तीवर ‘वन- अप प्रॉडक्शन्सही’ मराठीत नवी, टवटवीत स्टारकास्ट लाँच करणार आहे. विशेष म्हणजे ही संधी सर्व वयोगटांसाठी खुली आहे.
या निर्मिती संस्थेच्या मराठीतील पहिल्या सिनेमाचं काम लवकरच सुरू होणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी फ्रेशर्सना त्यांची सर्व माहिती ‘वन-अप एंटरटेनमेंट’ या संस्थेकडे पाठवावी. निवडक चेहऱ्यांना ऑडिशनसाठी बोलावले जाईल. ऑडिशनमध्ये निवडल्या जाणाऱ्यांना अंतिम ऑडिशनसाठी परत बोलावले जाईल व त्यानंतर आगामी सिनेमाची स्टारकास्ट जाहीर केली जाईल.
माहिती कशी पाठवाल? :
तुमची प्रोफाइल व्हॉट्सअपद्वारे 9987772644 या क्रमांकावर पाठवा.
प्रोफाइल ईमेल करा oneupcasting@gmail.com