समुद्रात जेवायचे किंवा समुद्राच्या पाण्यावर एक छानशी संध्याकाळ घालवायची असेल तर आता बांद्रा-वरळी सी लिंकच्या छायेत मुंबईच्या पहिल्या वहिल्या अनोख्या अशा तरंगत्या एबी सेलेस्टीअल हॉटेलद्वारे संपूर्णपणे नवीन अनुभव मिळू शकेल. हे नव्या प्रकारचे हॉटेल महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बांद्रा-वरळी सी लिंक, बांद्रा येथील जेटीवर असणार आहे.
डब्ल्यू इंटरनॅशनल कन्सल्टंटट्स द्वारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने संचालित एबी सेलेस्टीअल हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावल, पर्यटनमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
एबी सेलेस्टीअलची रचना आणि संबंधित ज्ञान हे अमेरिकेतून आणण्यात आले आहे. आधुनिक रचना, थ्री टायर लक्झरी स्काय डेक सहित डायनिंग फ्लोटेल, ६६० पाहुण्यांना सांभाळू शकणाऱ्या चार टायर्समधील दोन गॅलीज याच्यात असतील. एबी सेलेस्टीअल ऑनलाईन बुकिंग आणि अल्पोपहार व जेवण अशा सुविधाही देणार आहे. या फ्लोटेलमध्ये द्वीस्तरीय मल्टी-क्युझिन २ रेस्टोरंट २४ तास कॉफी शॉपची सुविधा असणाऱ्या क्लब लाउंजसहित असेल.
एबी सेलेस्टीअलचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की “हे फ्लोटेल अभ्यंगतांना अनोखा अनुभव देईल. शहर आणि राज्यात पर्यटनाला चालना देणाऱ्या नवीन संकल्पनांना सरकार नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा देत आले आहे. फ्लोटेलसारख्या वेगळ्या कल्पनांमुळे शहरात नक्कीच पर्यटक येतील आणि आदरातिथ्याचा एक वेगळा अनुभव त्यांना मिळेल.”