नाविन्याचा ध्यास घेत सकारात्मक संदेश
संवेदनशील कथानक आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या ‘ताटवा’ चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर नुकताच उत्साहात संपन्न झाला.
नाविन्याचा ध्यास घेत स्वत:ला घडवणं आवश्यक असल्याचा सकारात्मक संदेश देणारा ताटवा हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्मात्या डॉ. शरयू पाझारे यांनी व्यक्त केला.
‘प्रेम’ आणि ‘कला’ या दोन गोष्टी अशा आहेत कि ज्यांना जातीपातीचं बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ताटवा या सिनेमाची कथा गुंफली आहे. शरयू आर्ट प्रोडक्शन निर्मित ताटवा या चित्रपटाची निर्मिती डॉं. शरयू पाझरे यांची असून दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केलं आहे.
संजय शेजवळ, आणि गौरी कोंगे ही नवी जोडी ताटवा या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सोबत अरुण नलावडे, शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ.सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत.