सहभागी होणाऱ्यांमध्ये पीव्हीआरचा क्रमांक पहिला
भारतातील सर्वात मोठी सिनेमा वितरण कंपनी असलेल्या पीव्हीआर सिनेमाने आज वकाओ (vkaao.com) हा वेब मंच भारतात लाँच करत असल्याचे जाहीर केले. वकाओ वेब मंचामुळे एखाद्या व्यक्तीला स्थानिक थिएटरमध्ये कोणता सिनेमा लागावा हे निवडता येणार आहे. वकाओतर्फे भारतातील पहिलीच ‘थिएटर ऑन डिमांड’ सेवा आजपासून पीव्हीआर सिनेमाच्या संपूर्ण वर्तुळात उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर सिनेमाद्वारे वकाओच्या शेकडो स्टुडिओ आणि स्वतंत्र सिनेमाच्या कलेक्शनमधून वैयक्तिक निवडीच्या कार्यक्रमासांठी थिएटर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘‘आम्ही सिनेमाप्रेमींसाठी त्यांच्या आवडीचा सिनेमा, आवडीच्या थिएटरमध्ये पाहाण्याचा अनुभव घेण्याची नाविन्यपूर्ण सुविधा तयार केली आहे. वकाओद्वारे सिनेमाच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचा सिनेमा, जवळचे थिएटर, सिनेमाची वेळ इत्यादी गोष्टी ठरवून त्यांच्या ऑनलाइन वर्तुळात तातडीने त्याची माहिती देता येईल. सिनेमाच्या खेळासाठी आवश्यक प्रेक्षकांनी आपली उपस्थिती निश्चित केल्यानंतर स्क्रीनिंग निश्चित केले जाईल आणि वकाओ थिएटरचे आरक्ष, तिकिटांचे व्यवस्थापन, विनाअडथळा स्क्रीनिंग इत्यादी बाबींकडे लक्ष देईल, ज्यामुळे प्रेक्षकांना निवांतपणे सिनेमाचा आनंद घेता येईल. थिएटर ऑन डिमांड ही सेवा पुरवणाऱ्यांमध्ये आघाडी घेऊन पीव्हीआर भारतातील सिनेमा पाहाण्याचा अनुभव बदलून टाकण्यासाठी सज्ज झआले आहे,’’ असे संजीव कुमार बिजली, व्यवस्थापकीय संचालक, पीव्हीआर लि. यांनी सांगितले.
वितरक आणि स्वतंत्र सिनेमा दिग्दर्शकांबरोबर वकाओने केलेल्या भागिदारीमुळे त्यांना प्रेक्षकांसाठी विविध विषयांवरील सिनेमांची मोठी श्रेणी तयार करणे शक्य झाले आहे. त्यात अॅक्शन सिनेमे, थ्रिलर्सपासून, प्रत्यक्ष घटनेवर आधारित सिनेमे आणि हलक्याफुलक्या विनोदी सिनेमांचा समावेश असल्यामुळे ही श्रेणी प्रत्येक सिनेमाप्रेमीला आपलीशी वाटेल अशी आहे. वकाओच्या मागणीनुसार थिएटर सेवेच्या अनोख्या व्यासपीठावर नव्या आणि जुन्या सिनेमांचा विशिष्ट बाजारपेठांमध्ये प्रचार केला जाणार असून त्यामुळे नव्या व जुन्या सिनेमांना स्थानिक थिएटर्स व प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल.