ऐका ‘माझे राणी सोड अबोला…’ युट्यूबवर!
देवयानी मुव्हीजच्या आगामी मच्छिंद्र चाटे दिग्दर्शित ‘तु.का. पाटील’ या चित्रपटासाठी योगीराज माने यांनी लिहिलेले आणि राजेश सरकटे यांनी संगीत दिलेले ‘माझे राणी सोड अबोला…’ हे युगल गीत आशिष नाटेकर आणि साधना सरगम यांनी गायले आहे.
हे गीत आता रसिकांना युट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=-QScEZMBaoQ पाहता येईल.
‘हे गीत कसे वाटले?’ या विषयावर रसिकांनी युट्यूबवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात. देवयानी मुव्हीजच्या वतीने दहा निवडक प्रतिक्रियांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पारितोषिके दिली जातील.
अधिक माहितीसाठी रसिकांनी फेसबुक वरील ‘तु.का. पाटीलमराठी मुव्ही या पेजला लाईक करावे, असे आवाहन टीम ‘तु. का. पाटील’ने केले आहे.