पंचम निषादतर्फे सकाळच्या रागांची मैफल
एक स्वतंत्र आणि शुद्ध बैठक म्हणून तयार करण्यात आलेली आणि भारतीय शास्त्रीय संगिताचा शुद्ध व स्वच्छ चेहरा अनुभवता येईल अशी `उदयस्वर @ पृथ्वी` ही मैफल हा अत्यंत दुर्मिळ आणि खराखुरा नादमय अनुभव आहे.
सकाळच्या प्रसन्न वेळेत सांगीतिक मैफलींना रसिकांची वाढत जाणारी गर्दी लक्षात घेता पंचम निषाद व पृथ्वी थिएटर्स यांनी एकत्र येण्याचे ठरवले असून, परफॉर्मिंग आर्ट्सना चालना देण्यासाठी सकाळच्या दुसऱ्या प्रहरातील रागांचा `उदयस्वर @ पृथ्वी` हा स्वरमय नजराणा या दोघांनी रसिकश्रोत्यांसाठी तयार केला आहे.
आजच्या माईक्स आणि ध्वनिक्षेपकांच्या युगात, पृथ्वी थिएटरच्या सर्वोत्कृष्ट आणि अकॉस्टिक संगितामुळे कलाकार व रसिक श्रोत्यांमध्ये एक बंध निर्माण करण्याची व वातावरण ताजेतवाने करण्याची ताकद या संगितात आहे.
`उदयस्वर @ पृथ्वी` ही मैफल महिन्याच्या तिसऱ्या रविवार रंगत असून व्होकल आणि इन्स्ट्रुमेंटल कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमात जमते. आजपर्यंत या कार्यक्रमात देवकी पंडीत, बुधादित्य मुखर्जी, प्रसाद खापर्डे, संगीता शंकर, मंजुषा पाटील, मोही बहाऊद्दिन डगर, रघुनंदन पणशीकर, रुपक कुलकर्णी, शुचीस्मिता दास, मिलींद आणि यज्ञेश रायकर, जयतीर्थ मेवुंडी, तेजश्री आमोणकर, सतीश व्यास, उल्हास कशाळकर, शकीर खान, राहुल देशपांडे, राकेश चौरसिया आणि शुभा मुद्गल या कलाकारांचा समावेश झाले आहे. एप्रिल २०१७ पासून उदयस्वर @ पृथ्वी या मैफलीला बॅंक ऑफ बडोदाचा पाठिंबा लाभला आहे.
रविवार, २१ मे रोजी सकाळी ७.३० वाजता ‘उदयस्वर @ पृथ्वी’ या मैफलीत प्रसिद्ध सारंगीवादक साबीर खान आपला सोलो परफॉर्मन्स देणार आहेत.
साबीर खान हे ज्येष्ठ सारंगी वादक स्व. उस्ताद सुलतान खान यांचे सुपुत्र व शिष्य आहेत. त्यांची संगीताविषयीची आवड व त्यांचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे वयाच्या केवळ सहाव्या वर्षी आपले वडील व आजोबा सिकार घराण्याचे सारंगीवादक उस्ताद गुलाब खान यांच्याकडून सारंगीवादनाचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. साबीर यांची संगीतकला उत्कृष्ट असल्याने विविध रागांचा सुरेल संगम आणि भव्य अनुभव रसिक श्रोत्यांना येतो. साबीर यांनी आजवर भारतात व भारताबाहेरही झाकीर हुसेन, रणजित बारोट आणि सलीम-सुलेमान यांसारख्या दिग्गजांसोबत एकत्र परफॉर्मन्स दिला आहे.
कालावधी – दीड तास
कार्यक्रमाची तिकिटे (२०० रुपये)
पृथ्वी बॉक्स ऑफिस (२६१४९५४६) आणि www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
केवळ ८ वर्षांवरील मुलांना प्रवेश मिळू शकेल.