‘विकता का उत्तर’मध्ये बावन्न भूमिका
रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपटांत आपली वेगळी ओळख निर्माण केलेला हृषिकेश जोशी हा अवलिया अभिनेता प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी सज्ज आहे. ‘स्टार प्रवाह’वर सुरू होत असलेल्या ‘विकता का उत्तर’ या नव्या कोऱ्या गेम शोमध्ये थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५२ भूमिकांमध्ये दिसणार आहे.


स्टार अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेला ‘विकता का उत्तर’ हा गेम शो ७ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर दाखल होत आहे. प्रश्नोत्तराच्या खरेदी विक्रीवर आधारित असलेल्या ‘विकता का उत्तर’ या शोच्या टीजर्सनी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. अनोख्या संकल्पनेवरच्या या गेम शोमध्ये स्पर्धकांची बुद्धिमत्ता आणि व्यवहारकौशल्य पणाला लागणार आहे. मात्र, हा गेम शो रंजकदार करण्याचं काम हृषिकेश जोशी करणार आहे.