चित्रगौरवसाठी ‘सैराट’, ‘रंगा पतंगा’, ‘कासव’मध्ये चुरस
नाट्यगौरवमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘मग्न तळ्याकाठी’ला सर्वाधिक नामांकने
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच ‘राजेशाही थाटात’ पार पडला.
यावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वाधिक अकरा नामांकने मिळवली आहेत. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ने आठ आणि ‘हाफ तिकीट’ आणि ‘रंगा पतगा’ने सात विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.
व्यावसायिक नाटकांमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’ने बारा विभांगात नामांकने मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे तर ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाने नऊ विभांगात तथा ‘कोडमंत्र’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने प्रत्येकी सहा विभांगात नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘हे राम’ दहा नामांकने, ‘एमएच १२जे १६’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाने प्रत्येकी सात नामांकने मिळवली आहेत.
मराठी मनोरंजनाचं साम्राज्य अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या झी गौरव पुरस्काराचा नामांकन सोहळाही राजेशाही थाटात पार पडला. मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत देखण्या राजेशाही अंदाजात या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत नामांकने घोषीत करण्यात आली.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष लक्षवेधी ठरलं ते ‘सैराट’च्या विक्रमी कामगिरीमुळे. मराठी चित्रपटसुद्धा शंभर कोटींचं स्वप्न बघू शकतो हा विश्वास सैराटने निर्माण केला. अजय-अतुलच्या संगीताची जादू आणि आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. सैराटची ही जादू झी गौरवच्या नामांकनातही बघायला मिळाली. सैराटने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री, उत्कृष्ट संगीतासहित अनेक महत्त्वाच्या विभागांत नामांकने मिळवली. आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींच्या ‘कासव’नेही परीक्षकांचे लक्ष वेधत आठ नामांकने मिळवली आहेत. शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या संवेदनशिल ‘रंगा पतंगा’नेही सात नामांकने मिळवली आहेत. पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उबंटु’ चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासह इतरही महत्त्वाच्या विभागात नामांकने मिळवली आहेत.
सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेल्या आणि यावर्षी प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ने परीक्षकांचीही मने जिंकत बारा विभागांत नामांकने मिळवली आहेत. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीने आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकानेही नऊ विभागांत नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे.
यावर्षीच्या झी चित्र गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.
यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि किरण यज्ञोपावित यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात सुरेश खरे, विजय तापस आणि रविंद्र दिवेकर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी नितिन नेरुरकर, राजन ताम्हाणे आणि योगेश सोमण यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.
झी चित्रगौरव पुरस्कार २०१७ नामांकने
उत्कृष्ट वेशभूषा
- सचिन लोवळेकर – हाफ तिकीट
- रश्मी रोडे – रंगा पतंगा
- अपर्णा गुरम – एक अलबेला
उत्कृष्ट रंगभूषा
- विद्याधर भट्टे – एक अलबेला
- संतोष गायके – हाफ तिकीट
- श्रीकांत देसाई – रंगा पतंगा
उत्कृष्ट कलादिग्दर्शन
- वासू पाटील – हाफ तिकीट
- संतोष फुटाणे – उबंटु
- बबन अडगळे – एक अलबेला
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
- सुजीत कुमार – “उबंटु उबंटु” – उबंटु
- राहूल – संजीव – “ओ काका” – वाय झेड
- उमेश जाधव – “फिल्मी फिल्मी हुआ” – गुरु
उत्कृष्ट संकलन
- मोहित टाकळकर – कासव
- रामेश्वर भगत – व्हेंटिलेटर
- फैजल – इम्रान – हाफ तिकीट
उत्कृष्ट छायाचित्रण
- संजय मेमाणे – हाफ तिकीट
- धनंजय कुलकर्णी – कासव
- संजय मेमाणे – नदी वाहते
उत्कृष्ट ध्वनिरेखाटन
- अविनाश सोनावणे – सैराट
- अनमोल भावे – उबंटु
- सुहास राणे – नदी वाहते
उत्कृष्ट पार्श्वसंगीत
- अजय-अतुल – सैराट
- संकेत कानेटकर – कासव
- नरेंद्र भिडे – उबंटु
उत्कृष्ट गीतकार
- समीर सामंत – “माणसाने माणसाशी” – उबंटु
- इलाही जमादार – “ऐ सनम” – रंगा पतंगा
- अजय गोगावले – “झिंगाट” – सैराट
उत्कृष्ट पार्श्वगायिका
- सावनी रविंद्र – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट
- श्रेया घोषाल – “आताच बया का बावरलं” – सैराट
- नेहा राजपाल – “ओली ती माती” – फोटोकॉपी
उत्कृष्ट पार्श्वगायक
- आदर्श शिंदे – “ऐ सनम” – रंगा पतंगा
- अजय गोगावले – “याड लागलं” – सैराट
- गौरव ढगावकर – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट
उत्कृष्ट संगीत
- अजय-अतुल – सैराट
- गौरव ढगावकर – वन वे तिकीट
- कौशल इनामदार – रंगा पतंगा
उत्कृ्ष्ट कथा
- राजन खान – हलाल
- गिरीश जोशी – टेक केअर गुडनाईट
- अंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे – बंध नायलॉनचे
उत्कृष्ट पटकथा
- सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव
- गिरीश जोशी – टेक केअर गुडनाइट
- राजेश मापुसकर – व्हेंटिलेटर
उत्कृष्ट संवाद
- सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव
- नागराज मंजुळे – भारत मंजुळे – सैराट
- गिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- स्मिता तांबे – गणवेश
- प्रियांका कामत बोस – हाफ तिकीट
- पूनम शेडगावकर – नदी वाहते
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- प्रियदर्शन जाधव – हलाल
- सारंग साठे – उबंटु
- संदीप पाठक – रंगा पतंगा
उत्कृष्ट बालकलाकार
- आर्य आढाव – दशक्रिया
- शुभम मोरे, विनायक पोतदार – हाफ तिकीट
- भाग्यश्री शंखपाल – उबंटु
उत्कृष्ट अभिनेत्री
- इरावती हर्षे – कासव
- पर्ण पेठे – फोटोकॉपी
- रिंकू राजगुरु – सैराट
उत्कृष्ट अभिनेता
- मकरंद अनासपुरे – रंगा पतंगा
- आकाश ठोसर – सैराट
- गिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब
उत्कृष्ट दिग्दर्शक
- सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव
- नागराज मंजुळे – सैराट
- राजेश मापुसकर – व्हेंटिलेटर
उत्कृष्ट चित्रपट
- सैराट – झी स्टुडिओज्
- व्हेंटिलेटर – पर्पल पेबल पिक्चर्स व मॅगीज पिक्चर्स
- कासव – विचित्र निर्मिती
- टेक केअर गुडनाईट – एस.पी. एंटरटेन्मेट प्रा. लि.
- उबंटु – फेबल फॅक्टरी
व्यावसायिक नाटक – नामांकने
उत्कृष्ट वेशभूषा
- अजय खत्री – कोडमंत्र
- कल्याणी कुलकर्णी गुगळे – अमर फोटो स्टुडिओ
- प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव – मग्न तळ्याकाठी
उत्कृष्ट रंगभूषा
- केदार ओटवणेकर – हे राम नथुराम
- संतोष गिलबिले – अमर फोटो स्टुडिओ
- शरद सावंत – मग्न तळ्याकाठी
उत्कृष्ट पार्श्वसंगीत
- सचिन-जिगर – कोडमंत्र
- गंधार – अमर फोटो स्टुडिओ
- रोहित प्रधान – एक शून्य तीन
उत्कृष्ट प्रकाशयोजना
- शीतल तळपदे – अमर फोटो स्टुडिओ
- जयदीप आपटे – एक शुन्य तीन
- रवी- रसिक – मग्न तळ्याकाठी
उत्कृष्ट नेपथ्य
- प्रदीप मुळ्ये – अमर फोटो स्टुडिओ
- प्रसाद वालावलकर – कोडमंत्र
- प्रदीप मुळ्ये – तीन पायांची शर्यत
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- पूजा ठोंबरे- अमर फोटो स्टडिओ
- पूर्वा पवार- मग्न तळ्याकाठी
- स्वानंदी टिकेकर – एक शून्य तीन
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- वैभव मांगले – मग्न तळ्याकाठी
- लोकेश गुप्ते – तीन पायांची शर्यत
- सिद्धेश पुरकर – अमर फोटो स्टुडिओ
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
- सखी गोखले – अमर फोटो स्टुडिओ
- अपूर्वा नेमळेकर देशपांडे – आलाय मोठा शहाणा
- लेखा मुकुंद – अतिथी देवो भव
उत्कृष्ट विनोदी अभिनेता
- संतोष पवार – आलाय मोठा शहाणा
- संदीप गायकवाड – कानांची घडी तोंडावर बोट
- सुव्रत जोशी – अमर फोटो स्टुडिओ
उत्कृष्ट अभिनेत्री
- शुभांगी गोखले – साखर खाल्लेला माणूस
- मुक्ता बर्वे – कोडमंत्र
- शर्वरी लोहकरे – तीन पायांची शर्यत
- निवेदिता सराफ – मग्न तळ्याकाठी
- मानसी कुलकर्णी – छडा
उत्कृष्ट अभिनेता
- प्रशांत दामले – साखर खाल्लेला माणूस
- अजय पुरकर – कोडमंत्र
- संजय नार्वेकर – तीन पायांची शर्यत
- सुमीत राघवन – एक शून्य तीन
- गिरीश ओक – यु टर्न २
उत्कृष्ट लेखन
- आनंद म्हसवेकर – यु टर्न २
- विद्यासागर अध्यापक – साखर खाल्लेला माणूस
- महेश एलकुंचवार – मग्न तळ्याकाठी
- मनस्विनी लता रविंद्र – अमर फोटो स्टुडिओ
- विवेक आपटे – बंध मुक्त
उत्कृष्ट दिग्दर्शक
- राजेश जोशी – कोडमंत्र
- चंद्रकांत कुलकर्णी – साखर खाल्लेला माणूस
- चंद्रकांत कुलकर्णी – मग्न तळ्याकाठी
- विजय केंकरे – तीन पायांची शर्यंत
- निपुण धर्माधिकारी – अमर फोटो स्टुडिओ
उत्कृष्ट नाटक
- कोडमंत्र – अनामिका व रसिका
- साखर खाल्लेला माणूस – एकदंत क्रिएशन्स,अष्टविनायक व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन
- मग्न तळ्याकाठी – अष्टविनायक व जिगिषा
- तीन पायांची शर्यत – सुयोग
- अमर फोटो स्टुडिओ – सुबक
प्रायोगिक नाटक – नामांकने
उत्कृष्ट वेशभूषा
- प्रतिमा जोशी – आषाढ बार
- कुमार भुरके – बैल अ बोलबाला
- संतोष पवार – हे राम
- सौरभ मेस्त्री – अंदाजे चौसष्ट मांडलिकांचा देश
- मानसी नाईक – जनक
उत्कृष्ट प्रकाशयोजना
- प्रफुल्ल दीक्षित – हंडाभर चांदण्या
- राजस बापट – अंधाराचं बेट
- सुबोध राजगुरु, गौरव जोशी – MH 12 J 16
- अमोघ फडके – जनक
- विनोद राठोड – हे राम
उत्कृष्ट नेपथ्य
- अरुण कदम – हे राम
- निश्चय अटल, सुबोध पंडे – MH 12 J 16
- प्रदीप मुळ्ये – आषाढ बार
- वैभव पांडुरंग सातपुते – गारा
- सुमीत पाटील – अॅब्सोल्युट
उत्कृष्ट संगीत
- भानुदास गायकवाड – बैल अ बोलबाला
- रोहित सरोदे – हंडाभर चांदण्या
- आशुतोष वाघमारे – हे राम
- निलेश ढोबळे – गारा
- जोशुआ अॅंड बेकी, आशुतोष – अॅब्सोल्युट
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- कल्याणी मुळ्ये – आषाढ बार
- ऋता पंडित – MH 12 J 16
- मृणाल वरुणकर – असूरवेद
- तृप्ती जाधव – चाहूल उद्याची
- अपर्णा गोखले – जनक
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- उदय बराध्ये – हे राम
- प्राजक्त देशमुख – हंडाभर चांदण्या
- जयदीप मुजुमदार – MH 12 J 16
- अंकुश काणे – जनक
- नितीन जाधव – गारा
उत्कृष्ट अभिनेत्री
- तेजस्वी परब – हे राम
- अश्विनी कासार – बेबी डॉल
- आरती वडगबाळकर – बैल मेलाय
- डॉ. प्रिया जामकर – सावित्री
- गौरी नलावडे – अॅब्सोल्युट
उत्कृष्ट अभिनेता
- विकास पाटील – बैल मेलाय
- निशांत कदम – हे राम
- अनिल रसाळ – जनक
- नितीन जाधव – गारा
- प्रणव प्रभाकर – हंडाभर चांदण्या
उत्कृष्ट लेखक
- राम दौंड – हे राम
- दत्ता पाटील – हंडाभर चांदण्या
- डॉ. विवेक बेळे – MH 12 J 16
- मकरंद साठे – आषाढ बार
- शार्दुल सराफ – जनक
उत्कृष्ट दिग्दर्शक
- राम दौंड – हे राम
- सचिन शिंदे – हंडाभर चांदण्या
- अनिकेत साने – बेबी डॉल
- सुबोध पंडे – MH 12 J 16
- राजीव मुळ्ये – बैल अ बोलबाला
उत्कृष्ट नाटक
- हंडाभर चांदण्या – सोशल नेटवर्किंग फोरम
- बैल अ बोलबाला – लोकरंग मंच, सातारा
- MH 12 J 16 – प्रयोग, पुणे
- बेबी डॉल – ब्रदर्स निर्मित
- हे राम – विजिगीषा फाउंडेशन, कल्याण