जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन सुरु
कलकत्ता येथील मौमिता बिस्वास – घोष, शुवेन्दू सरकार, दिब्येंदू उकिल, आर्य प्रहाराज,अरुण कुमार मंडल,पार्थप्रतिम बिस्वास व सुदीप चंद्रा हया सुप्रसिद्ध सात चित्रकारांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत दि. ३१ मार्चपासून सुरू झाले असून ते सोमवार दि. ६ एप्रिलपर्यन्त रसिकांना ११ ते ७ या वेळेत पाहता येईल.
चित्रकर्ती मौमिता बिस्वास – घोष यांनी मिक्स मीडिया वापरुन कॅनव्हासवर काढलेल्या चित्रात गत काळातील आठवणी आपल्या खास शैलीत रेखाटली आहेत. चित्रकार शुवेन्दू सरकार यांनीआपल्या कलाकृतीतून अक्रीलिक रंग व पेन आणि शाई वापरुन कॅनव्हासवर काढलेल्या चित्रात दैनंदिन जीवनातील विविध आठवणी व प्रसंग हयांचे रम्य दर्शन घडवले आहे. चित्रकारदिब्येंदू उकिल यांनी अक्रीलिक रंगलेपनातून बनारस घाटावरील फुले विकणार्या मुली,धार्मिक वातावरण व तेथील इतर दृश्यांचे यथार्थ दर्शन घडवले आहे. चित्रकार आर्य प्रहाराज यांनी निम्न वास्तववादी शैलीत निसर्ग, फुले वगैरेचे रम्य दर्शन घडवले आहे.
चित्रकार अरुण कुमार मंडल यांनी अक्रीलिकरंगलेपनातून कॅनव्हासवर काढलेल्या विविध चित्रांमध्ये राधाकृष्ण व तत्सम व्यक्तीचित्रांमधून दैवी व उदात्त प्रेम भावनांचे दर्शन घडवले आहे. चित्रकारपार्थ प्रतिम बिस्वास यांनी अक्रीलिक रंगलेपनाद्वारे व संवाद माध्यमातूनगतकाळातील रम्य आठवणींना व दैनंदिन जीवनातील भावनिक प्रसंगांना व विविध कलारूपांना सजीव रूप दिले आहे. चित्रकार सुदीप चंद्रा यांनीकॅनव्हासवर अक्रीलिक रंग,पेन आणि शाई वापरुन अनेक व्यक्तीरूपातूनविविध भावनांचे आकर्षक दर्शन घडवले आहे. एकंदरीत कलारूपांचे विविध पैलू येथे सामूहिकरित्या साकारताना सर्व चित्रकारांनी आपल्या शैलीचे व रंगमाध्यमावरील प्रभूत्वाचे एक मनोहर दर्शन घडवले आहे हे निर्विवाद.