प्रख्यात चित्रकार सुरेंद्र जगताप यांनी अलिकडच्या काळात चित्रीत केलेल्या चित्रांचं ‘वुमन ऍन्ड ह्युमन’ हे प्रदर्शन मुंबईत मांडण्यात आलं आहे. सदरप्रदर्शन १६१ बी, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३ येथे दिनांक ३फेब्रुवारीपासून सुरु झाले असून ते ९ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ तेसायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामूल्य खुलं राहील.
निसर्गदत्त देणगी असलेलं स्त्रीत्व म्हणजे प्रतिभा आणि प्रेरणा यांचा संगम आहे. जीवनात विविध कालखंडात स्त्रीत्वाचे अनेक पैलू उघड होत जातात. सामाजाचा अविभाज्य भाग असलेली स्त्री आयुष्यात लाडकी लेक, प्रिय बहिण, जीवलग सखी, आराध्य पत्नी, प्रेमळ आई आणि मुख्य म्हणजे नवजीवनाची निर्माती अशा अनेक भुमिका साकार करीत असते. एक छायाचित्रकार तिला कॅमेर्याच्या फ्रेममध्ये बंदीस्त करतो, चित्रकार तिचं रुप निखारतो, कवी कल्पनेच्या झुल्यावर झुलवतो, शिल्पकार प्रतीरुप बनवतो तरी ती दशांगुळे भरून उरतेच. स्त्री ही निसर्गाने घातलेलं एक कोड आहे, जे उलगडून दाखवताना दाखवणाराच त्यात गुंतत जातो. असा हा अवघड विषय चित्रकार सुरेंद्र जगताप यांनी कॅनव्हासवर मांडला आहे. रोजच्या जीवनातली ही प्रेरणा कुंचल्याच्या सहाय्याने चित्रीत करणार्या कलाकाराला दाद देता देता आपल्या आजूबाजूला वावरणारी ही आदी शक्ती पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी या प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी.
अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित, असंख्य प्रदर्शनाद्वारे चित्ररसिकांना परिचित असलेले प्रसिद्ध चित्रकार प्रा. सुरेंद्र जगताप यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ३ फेब्रुवारीपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू झाले असून, ते ९ फेब्रुवारीर्पयत सुरू राहणार आहे. या कलाकृतींमध्ये स्त्रीसौंदर्याचे चित्रण केले असून, प्रा. सुरेंद्र जगताप यांनी या चित्रंविषयी व्यक्त केलेले मनोगत महत्त्वाचे आहे.
कलाकृतीबद्दल कलावंताचे मनोगत
ते म्हणतात, निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट.. सजीव. त्या प्रत्येक सजीवास जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे. पुरुषाप्रमाणो स्त्री ही निसर्गाचाच एक भाग आहे, मग स्त्रीने अत्याचार का सहन करायचा? ती माणूस नाही? ती आज कोणाची गोंडस मुलगी आहे, तीच कोणाची आई-बहीण आहे. तीच तारुण्यात प्रेयसी आहे, तीच कालांतराने आपली लाडकी आजी-पणजी आहे. एकच शरीर एकच स्त्री- परंतु अनेक रूपं तिच्यात आहेत. ती अनेक जबाबदा-या निभावते आणि तिच्याशिवाय पुरुषाचा जन्म होत नाही. जगात आजर्पयत प्रत्येक तत्वज्ञानी, चित्रकार, शिल्पकार, शास्त्रज्ञ, कवी, गायक, संगीतकार सर्वानीच स्त्रिला सर्वात सुंदर मानले आहे. त्या सौंदर्याला जपणे, त्याचे रक्षण करणो हे सर्वाचे कर्तव्य आहे. आपण जगातील प्रेक्षणीय स्थळी फिरायला जातो, त्यात जिथे जिथे निसर्गरम्य ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी राहून त्याचा मनमुराद आस्वाद घेतो. ते नजरेत, कॅमेरामध्ये टिपतो. तसेच स्त्रिकडेही पाहणे गरजेचे आहे. स्त्रीही निसर्गाचाच एक सुंदर भाग आहे. निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती म्हणून पाहणो गरजेचे आहे. त्या सौंदर्याला वासनेच्या नजरेतून पाहणो हे मनुष्य जातीला कलंक आहे.प्राण्यांना बुद्धी नाही, असे मनुष्य म्हणतो, माणसाला बुद्धी आहे, तर त्याने पशुकृत्य करू नये. आज स्त्रियांवरील अत्याचारांचे वृत्त रोज अनेक ठिकाणी पहावयास, वाचावयास मिळते. मग प्रश्न पडतो की माणूस माणूसच आहे की पशू? पशू आणि माणसात फरक काय? याला केवळ माणूसच बदलू शकतो. केवळ आणि केवळ निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती म्हणून पाहणो त्याचे जतन आणि रक्षण करणो आवश्यक आहे. मी माझ्या चित्रांत स्त्रिचे नग्नचित्रण केले नसून, स्त्री ही किती सुंदर आहे, मोहक आहे हे सांगून स्त्रीसौंदर्याचे चित्रण केले आहे. तीला फुलपाखरासारखे विहार करू द्या. सौंदर्यामुळेच मनुष्य जीवन जगू शकतो, सौंर्दयच नसते तर जगणे अत्यंत निरस झाले असते.
-प्रा. सुरेंद्र जगताप