आतापर्यंत पाच हजारावर प्रयोग होऊनही पुन्हा पुन्हा गर्दी खेचणारे प्रा. मधुकर तोरडमल लिखित अजरामर नाटक “तरुण तुर्क म्हातारे अर्क” पुन्हा एकदा नव्या जोमाने, नव्या टीमसहित रंगभूमीवर येत आहे.
एन नाइन आर्टसच्या बॅनरखाली निमेश सावे निर्मित “तरुण तुर्क म्हातारे अर्क” या नाटकाचा मुहूर्त नुकताच सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांच्या घरी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या नाटकाचे दिग्दर्शन राजन पाटील हे करत असून दिग्दर्शनसहाय्य योगेश चव्हाण, नेपथ्य प्रदीप देशमुख, प्रकाश प्रशांत जोशी, संगीत अरुण कानविंदे तर चंद्रशेखर तारकर हे सूत्रधार आहेत. या नाटकात अभिनेते अशोक शिंदे, प्रदीप पटवर्धन प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्यासोबत दिप्ती पाटणकर, मृणालिनी जांभळे, गौरव सावे, सिद्धांत घरत – सुबोध शिंदे, देवेश काळे, रत्नाकर देशपांडे हे इतर भूमिकेत आहेत. हया नाटकाचा पहिला प्रयोग मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणार आहे.