कोलकता येथील प्रसिद्ध चित्रकार द्विजेन गुप्ता यांनी अलीकडेच रेखाटलेल्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन मुंबईतील फोर्टमधील आर्टिस्ट सेंटर कलादालनात १६ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, ते २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या कलाकृतींद्वारे महिलांच्या चेह-यावरील भाव आणि काही चित्रांमधून त्यांचे तत्त्वज्ञान रेखाटले आहेत.
द्विजेन गुप्ता हे गेल्या २५ वर्षापासून रंगलेखनात गुंतले असून, ते देश-विदेशातील एकल आणि समूह अशा अनेक चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांना परिचित आहेत.
द्विजेन गुप्ता यांनी आपले पदवीचे शिक्षण कोलकता येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट आणि क्राफ्ट येथे पूर्ण केले. लार्ज वाटर कलर, कृत्रिम धाग्याचे कापड, कागद, कॅनव्हास आणि मिश्रमीडिया या चित्रकलेच्या प्रकारांमध्ये द्विजेन गुप्ता यांनी प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या चित्रांमध्ये महिलांचा साधेपणा लगेच लक्ष वेधून घेतो. फिगरेटिव चित्रांमध्ये वॉटर कलर आणि मिश्रमीडियामधील शैलीत ते व्यक्त होतात.