मुंबईतील ‘अवतरण’ अकादमीच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. यंदाही या सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
या दोन्ही स्पर्धा १६ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून, द्विपात्री अभिनय स्पर्धेत ५ ते ७ मिनिटांचा मराठी नट्याअंश सदर करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज २० मार्चपर्यंत करावा लागेल. एकांकिका लेखन स्पर्धेसाठी स्वलिखित मराठी एकांकिकेच्या दोन प्रती पाठवायच्या असून, त्यासोबत लेखकाने सदर एकांकिका स्वतंत्र, अप्रकाशित, व प्रयोग न झालेली असल्याचे पत्र, स्वतंत्र कागदावर सहीनिशी सोबत जोडायचे आहे.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे आणि प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके, मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेही देण्यात येतील.
प्रवेश नोंदणी, स्पर्धेचे नियम व अटी, स्पर्धेचे ठिकाण आदी तपशीलासाठी सौ. भारती सावंत ९५९४४१६७३५ किंवा सौ. विनया लाड ९८६९४८६७२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अवतरण’चे प्रमुख संभाजी सावंत यांनी केले आहे.