१० ते १६ मार्चदरम्यान भरणार चित्रप्रदर्शन
मुंबईमधील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून फाईन आर्टची पदवी घेतलेले विक्रांत शितोळे यांचे चित्रप्रदर्शन वरळीतील नेहरू कलादालनात १० मार्चपासून सुरु होत असून ते १६ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. जलरंगामधील चित्रे हे त्यांचे विशेष कौशल्य आहे.
कलाकृतींना इस्तंबूल वाटरकलर सोसायटी तसेच जर्मनीतील पाम आर्ट अवार्ड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अनेक ठिकाणी फिरून त्यांनी चित्रे काढली आहेत. एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील वातावरणाचे, त्या जागेचे व वास्तूचे अस्तित्व व संवेदना याचा अनुभव घेऊन ती अनुभूती चित्रांमध्ये
उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या प्रदर्शनामध्ये त्यांनी भारतातील राजस्थान, बनारस, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चित्रित केकेल्या कलाकृती पहावयास मिळतील.