सोलापूरचे ‘इस्कॉलोवा’ द्वितीय; ठाण्याचे ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला.’ तिसरे!
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित ६२व्या राज्यस्तरीय कामगार नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईतील वरळीच्या कामगार कल्याण भवनचे ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले.
सोलापूरच्या कामगार कल्याण केंद्राचे ‘इस्कॉलोवा’ने दुसरा क्रमांक पटकावला असून, तिसरा क्रमांक ठाण्यातील राबोडीच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला? ऊर्फ कोलंबसला सापडले ते काय होते?’ या नाटकाला जाहीर झाला आहे.
चिपळून केंद्राचे ‘लव्ह नेव्हर डाईज’ आणि रत्नागिरी केंद्राचे ‘प्यादी’ या नाटकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
मुंबईतील विक्रोळीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात ४ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारदरम्यान एकूण १६ नाटकांचे प्रयोग या स्पर्धेत सादर झाले होते. परीक्षक म्हणून पां. तु. पाटणकर, डॉ. नीलकांत कुलसंगे, संभाजी सावंत, शकुंतला नरे आणि विमल म्हात्रे यांनी या नाटकांचे मूल्यमापन केले. परीक्षकानी दिलेला निकाल कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे यांनी जाहीर केला.
इस्कॉलोवा
पुरावाच काय आहे अमेरिकेला?…
सविस्तर निकाल
उत्कृष्ट नाटक
प्रथम : स्लाईस ऑफ लाईफ (ललित कला भवन, वरळी).
द्वितीय : इस्कॉलोवा (कामगार कल्याण केंद्र, सोलापूर).
तृतीय : पुरावाच काय आहे अमेरिकेला?.(का. क. केंद्र, राबोडी ठाणो)
उत्तेजनार्थ : लव्ह नेव्हर डाईज (का. क. केंद्र, चिपळूण)
उत्तेजनार्थ : प्यादी (का. क.केंद्र, रत्नागिरी)
उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम : सुनील हरिश्चंद्र (स्लाईस ऑफ द लाईफ)
द्वितीय : आनंद खरबस (इस्कॉलोवा)
तृतीय : अभिजित झुंजारराव (पुरावाच काय..)
उत्कृष्ट अभिनय (पुरुष)
प्रथम : प्रसाद ठोसर (सर ललित पंचम) नाटक : स्लाईस ऑफ द लाईफ
द्वितीय : राहुल सिरसाट (जयंतराव) नाटक : पुरावाच..
तृतीय : अमोल देशमुख (तरुण) नाटक : इस्कॉलोवा
उत्तेजनार्थ :
१. ओंकार पाटील (आदित्यराव) नाटक : प्यादी
२ . धनंजय धनगर (समीर) नाटक : ध्यानीमनी (चंद्रपूर)
३ . गौरव मालणकर (संदेश) नाटक : स्लाईस ऑफ..
४. संकेत लवंदे (राजेश) नाटक : लव्ह नेव्हर डाईज
५. स्वप्नील काळे (समीर) नाटक : लव्ह नेव्हर डाईज
६ . अमय सूर्यवंशी (पै) नाटक : वा गुरू (नाशिक)
७. विवेक खराटे (नारबा) नाटक : काळोख देत हुंकार (औरंगाबाद)
८ . श्याम आस्करकर (भाऊ) नाटक : क्षण एक पुरे (नागपूर)
९ . अमित उमक (कण्व) नाटक : जस्ट अॅक्ट३६३ (खापरखेडा)
१०. वैभव देशमुख (चंदर) नाटक : बेईमान (बडनेरा)
उत्कृष्ट अभिनय (महिला)
प्रथम : नेहा अष्टपुत्रे (ती) नाटक : पुरावाच काय..
द्वितीय : नीता देवेकर (लक्ष्मी) नाटक : सखाराम बाईंडर (मुंबई)
तृतीय : शिल्पा ढोक (मंजुषा) नाटक : जादू तेरी नजर (अमरावती)
उत्तेजनार्थ
१ . गायत्री देशपांडे (अपर्णा) नाटक : ध्यानीमनी (चंद्रपूर)
२ . अश्विनी डिखोलकर (विदूषक 1) नाटक :जस्ट अॅक्ट. (खापरखेडा)
३ . पूजा गायकवाड (शिरमी) नाटक : काळोख देत हुंकार (औरंगाबाद)
४ . दर्शना रसाळ (वसुधा) नाटक : पुरावाच काय..
५ . सई मोने पाटील (जान्हवी) नाटक : वा गुरू (नाशिक)
उत्कृष्ट नेपथ्य
प्रथम : सुनील/सुमीत (स्लाईस ऑफ लाईफ)
द्वितीय : अशोक पालेकर (लव्ह नेव्हर डाईज)
तृतीय : सतीश काळबाडे (ध्यानीमनी)
उत्कृष्ट पाश्र्वसंगीत
प्रथम : प्रथमेश उमाळकर (एक क्षण पुरे) नागपूर
द्वितीय : सुनील तारामती (स्लाईस ऑफ द लाईफ)
तृतीय : किरण जोशी (इस्कॉलोवा)
उत्कृष्ट प्रकाशयोजना
प्रथम : राजेश पंडित (स्लाईस ऑफ द लाईफ)
द्वितीय : गणोश मरोळ (इस्कॉलोवा)
तृतीय : जयदीप आपटे (पुरावाच काय..)
उत्कृष्ट नाटय़लेखन
आनंद खरबस (इस्कॉलोवा)