वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रम
२० मार्च २०१५ रोजी मुंबईतील संगीतप्रेमींना चतुरस्त्र पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि “समर्पण” चमूतील इतर कलाकारांची जादुई अदाकारी अनुभवायला मिळणार आहे. वाडकर यांच्याबरोबर निनाद मुळावकर (बासरी), मानस कुमार (व्हायोलीन), ओजस अधिया (तबला), गौतम शर्मा (तंतुवाद्य), विशाल धुमाळ (कि-बोर्ड) आणि आय. डी. राव (सेक्साफोन) या कलाकरांचा त्यात समावेश असेल. वरळी येथील नेहरू सेंटर येथे २० मार्च २०१५ रोजी सायंकाळी ७. ३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
“समर्पण” ही युवा कलाकारांनी एकत्र येऊन ब्रॅंडच्या रुपात सुरु केलेली एक चळवळ असून पारंपारिकरीत्या अत्यंत उच्च अशा भारतीय शास्त्रीय संगीताप्रति त्या माध्यमातून आदर व्यक्त केला गेला आहे. नवातून ध्वनित होत असल्याप्रमाणे उच्च अशा सांगीतिक रूढी-परंपरांना समर्पित होणे आणि संगीताचा प्रत्येक क्षण सांगीतिकदृष्ट्या अधिक आनंदमय करणे हे त्यामागील उद्दिष्ट्य आहे. हे संगीत खरीखुरी आवड आणि जोश ध्वनित करते. “समर्पण”ने आतापर्यंत कित्येक प्रतिष्ठित अशा महोत्सवांमध्ये भाग घेतला असून त्यात बडोदा येथी “संस्करण” आणि हैदराबाद येथील ‘हैदोराईट’चा समावेश आहे.
आज सुरेश वाडकर यांच्याकडे एक अत्यंत प्रतिभावान आणि चतुरस्त्र पार्श्वगायक म्हणून पाहिले जाते. त्यांनी आतापर्यंत अनेक आघाडीच्या तसेच होतकरू संगीत दिग्दर्शकांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांना आतापर्यंत कित्येक मानाचे सन्मान मिळाले आहेत. त्यात ९ महाराष्ट्र, ३ गुजरात, २ पंजाबमधील उत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी संगीत दिग्दर्शनामध्येही प्रवेश केला आहे. ‘अशी हि ज्ञानेश्वरी’ या त्यांच्या पहिल्याच प्रयत्नाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.
“समर्पण”चे आयोजन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर यांनी संयुक्तरीत्या केले आहे. आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला वेगळा अर्थ, वेगळी ओळख आणिवेगळी दृष्टी प्राप्त करून देणे आणि त्या माध्यमातून परिपूर्ण मनोरंजन साध्य करणे हे या संस्थांचे उद्दिष्ट आहे.रसिक आणि लोकांच्या आनंदासाठी व्यावसायिक दृष्टीकोनातून हे साध्य केले जाते. जगभरातील रसिकांसमोर भारताचा भव्य आणि सांगितिक उंची वारसा सादर करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआरने आतापर्यंत कित्येक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये देशभर आयोजित करण्यात आलेल्या अनेक भारतीय शास्रीय संगीत कार्यक्रमांचा समावेश आहे.