५४ व्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेचा निकाल जाहीर
नागपूरची ‘विठाबाई’ द्वितीय, पुण्याचे ‘परवाना’ तृतीय
५४ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाटय़ स्पध्रेत लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेस ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकासाठी रु.३ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पध्रेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल जाहीर केला असून, अंकुर मानव समाज उत्थान केंद्र,नागपूर या संस्थेच्या ‘विठाबाई’ या नाटकास रु. २ लाखाचे द्वितीय पारितोषिक आणि ध्यास, पुणे या संस्थेच्या परवाना या नाटकासाठी रु. १ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
व्यक्तिगत पुरस्कार खालीलप्रमाणे
दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक (रु.५००००) मुकुंद कुलकर्णी (नाटक-न हि वैरेन वैरानी)
द्वितीय पारितोषिक(रु.४००००) संजय जीवने (नाटक-विठाबाई)
तृतीय पारितोषिक (रु.३००००) श्रीकांत भिडे (नाटक-परवाना)
नेपथ्य :
प्रथम पारितोषिक (रु.१५०००) किरण समेळ (नाटक-न हि वैरेन वैरानी)
द्वितीय पारितोषिक (रु.१००००) सुखदा मराठे (नाटक-गुरु)
तृतीय पारितोषिक (रु.५०००) विजय कोळवणकर (नाटक-हार्दिक आमंत्रण)
प्रकाश योजना :
प्रथम पारितोषिक (रु.१५०००) विजय रावळ (नाटक-न हि वैरेन वैरानी )
द्वितीय पारितोषिक (रु.१००००) भूषण देसाई (नाटक-मस्तानी)
तृतीय पारितोषिक (रु.५०००) श्रीकांत भिडे (नाटक-परवाना)
रंगभूषा :
प्रथम पारितोषिक (रु.१५०००) प्रशांत कुलकर्णी (नाटक-एक चादर मैलीसी)
द्वितीय पारितोषिक (रु.१००००) माणिक कानडे (नाटक-न हि वैरेन वैरानी)
तृतीय पारितोषिक (रु.५०००) विजय ढेरे (नाटक-क्राईम एॅन्ड पनिशमेंट)
संगीत दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक (रु.१५०००) निषाद कुलकर्णी / प्रसाद भालेराव (नाटक-न हि वैरेन वैरानी)
द्वितीय पारितोषिक (रु. १००००) आकाश करवंदे (नाटक-परवाना)
तृतीय पारितोषिक (रु.५०००) सोनाली बोहरपी-जावळे (नाटक-विठाबाई)
उत्कृष्ट अभिनय : (रौप्यपदक व रु.१००००)
पुरुष कलाकार :-
हेमंत देशपांडे (नाटक-न हि वैरेन वैरानी), दीपक अमोणकर (नाटक-महाप्रस्थान), ओमकार तिरोडकर (नाटक-ती), गजानन नार्वेकर (नाटक-गुरु), आदित्य खेबुडकर (नाटक-क्राईम एॅन्ड पनीशमेंट), अमोल देशमुख (नाटक-इस्कॅलॅवो),शंभू पाटील (नाटक-अपुर्णाक), राज साने (नाटक-एक चादर मैलीसी), निखील भोर (नाटक-न हि वैरेन वैरानी), रोशन श्रीवास्तव (नाटक-विठाबाई)
स्त्री कलाकार :
सांची जीवने (नाटक-विठाबाई), श्रुति अत्रे (नाटक-परवाना), पुजा वेदविख्यात (नाटक-न हि वैरेन वैरानी), वंदना जीवने (नाटक-विठाबाई), मेघा पाथरे (नाटक-हाíदक आमंत्रण), शिवानी घाटगे (नाटक-एक चादर मैलीसी), रसिया पडळकर (नाटक-क्राईम एॅन्ड पनीशमेंट), नुतन धवने (नाटक-ध्यानी मनी), वैशाली जाधव (नाटक-प्यादी), प्रज्ञा चवंडे(नाटक-प्यादी)
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे-
मंजुषा भिडे (नाटक-अपुर्णाक), विशाखा दरेकर (नाटक-मस्तानी), ऋतुजा गद्रे (नाटक-परवाना), प्रतिक्षा जंगम(नाटक-अपुर्णाक), पूर्ती सावर्डेकर (नाटक-महाप्रस्थान), साबा चारी (नाटक-गुरु), किशोर पुराणिक (नाटक-सहज सुचल म्हणून), अमोल कुलकर्णी (नाटक-शनिवार रविवार), राजा भगत (नाटक-दाभोळकरचे भूत), मनिष पाठक (नाटक-शनिवार रविवार)
दि. १६ फेब्रुवारी ते १३ मार्च २०१५ या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह, पनवेल येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या अंतिम फेरीत एकूण २१ नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पध्रेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, संजीव वढावकर, अजय टिल्लू, मंगेश बनसोड यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.