२१ मार्चला यशवंत नाट्यमंदिरात नव्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम!
यंदाचा गुढीपाडवा आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनई वादक स्वर्गीय पं. बिस्मिल्ला खान यांचा जन्मदिवस एकाच दिवशी आले असल्याचे औचित्य साधून चैत्र चाहूल परिवाराने बिस्मिल्ला खान यांना आदरांजली म्हणून सनई वादन योगेश मोरे व सहकलाकार करणार आहेत.

या वर्षी २०१५ सालाचा चैत्र चाहुलचा सन्मान आंतरराष्टीय ख्यातीची चित्रकर्ती, साहित्य अकादमी पुरस्कार विजेती लेखिका, गायिका श्रीमती माधुरी पुरंदरे यांना ध्यास सन्मान तर प्रायोगिक तसेच व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता व दिग्दर्शक म्हणून नावाजलेले श्री. विजय केंकरे यांना रंगकर्मी सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रसिकांना दरवर्षाप्रमाणे पन्ह व सोनचाफा देऊन स्वागत करण्यात येईल. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कॉक्स एन्ड किंग्स व इस्रालय लेंड ऑफ क्रिएशन तसेच सह प्रायोजकत्व एनकेजीएसबी बँक व एलआयसी यांनी स्वीकारले आहे. मराठी संस्कृती व मराठीवर प्रेमकरणा-याना हॉलवर विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध असून पहिल्या १२ रांगा राखीव असणार आहेत.