सलवा रसूल यांच्या कलाकृतींचे मुंबईत २७ ते ३१ मार्चदरम्यान प्रदर्शन
सलवा रसूल या अरेबीक कॅलिग्राफी कलाकार आपल्या कलाकृतींचे ‘एलाहीया २०१५’ हे प्रदर्शन मुंबईत वांद्रे येथील कॅच गॅलरीमध्ये भरवत आहेत. २७ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनाचे आयोजन कॅन्सर पेशंट्स एड असोशीएशनचे (सीपीएए)वार्षिक प्रदर्शन ‘कलर्स ऑफ लाईफ’च्या संयोजिका पियाली श्याम करणार आहेत.
मार्च महिन्यात मुंबईमध्ये आयोजित केलेल्या आपल्या प्रदर्शनात सलवा रसूल या ३५ ते ४० कलाकृती मांडणार आहेत. ‘अल्ला’ हा त्यांचा एक आवडता विषय असून तो त्यांनी अनेक प्रकार आणि शैलींच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये जागतिक अर्थ सामावलेले काही सामायिक कुराण शब्द आणि कवने आहेत आणि त्यांतून सकारात्मक कंप निर्माण होतात. सलवा यांच्या कलाकृती या त्यांचे झपाटलेपण आणि शांतता यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे असे ठाम मत आहे कि या प्रकारातील कलाकृती या त्यांच्या जागतिक संदर्भामुळे आणि सर्जनशील भावनांमुळे धार्मिक सीमा छेदून जातात. सर्वच धार्मिक ग्रंथ हे प्रेम आणि शांतता यांचीच शिकवण देतात असे त्यांचे ठाम मत आहे. वैविध्यपूर्ण माध्यमांचा वापर करून या गोष्टीचा प्रसार त्या ज्या पद्धतीने करतात, त्यातून हेच अधोरेखित होते.
सलवा या प्रदर्शनाच्या माध्यमातून येणा-या उत्पन्नातील काही हिस्सा हा ‘सीपीएए’ला देणार आहेत कारण त्यांना हे सामाजिक काम अत्यंत महत्वाचे वाटते.
त्या अरबी शब्द किंवा कवनांना एक अलंकृत किंवा अमूर्त अशी शैली देतात. त्यानंतर त्या आपल्या चित्रांना अनेक प्रकारचे पोत देत रचतात. त्यामुळे त्यांच्या कलाकृतींना ‘थ्रीडी’ परिमाण देणारे गूढ मायाजाल प्राप्त होते. सलवा यांची खाशियात कॅलीग्राफी असली तरी त्यांच्या चतुरस्त्र दृष्टीकोनामुळे आणि तंत्रामुळे कोणत्याही कलाकृती या एकसारख्या वाटत नाहीत. या वेगळ्या कलाकृती प्रशिक्षित नजरेला तर भावतातच पण ज्यांना पारंपारिक कॅलीग्राफीमधील विशेष काही कळत नाही त्यांनाही भावतात.
“त्यांनी आपली अशी एक शैली निर्माण केली आहे की ज्यामुळे त्यांच्या कलाकृतींनी भाषेचे अडथळे दूर केले आहेत,” असे उद्गार प्रख्यात देवनागरी कॅलीग्राफर अच्युत पालव यांनी काढले आहेत.
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थिनी असलेल्या सलवा यांनी गेली २५ वर्षे आपले अरेबीक कॅलीग्राफीचे प्रेम जोपासले आहे. हे कला मध्य-पूर्व देशांमध्ये लोकप्रिय आहे आणि अरबी कॅलीग्राफीमध्ये काम करणा-या त्या कदाचित एकमेव भारतीय कलाकार आहेत. त्याचमुळे त्यांनी भारतीय कला बाजारपेठेत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अरबी अक्षरांना एक शैली मिळवून देत सलवा यांनी कॅलीग्राफीमध्ये पारंपारिक फोन्ट निर्माण केले आहेत. कुफिक, थुलुथ, देवाणी आणि इतर फोन्टचा त्यात समावेश आहे. त्यांनी आपल्या स्वतः निर्माण केलेल्या अक्षरांना समकालीन प्रकारांबरोबर मेळ घातला आहे. ते करत असताना त्यांनी कलात्मक पद्धतीने विविध प्रकार एकत्रित आणले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक कलाकृती एक उत्तम कलाकृती ठरली आहे. त्यांच्या संकालानामेध्ये नव्या आणि जुन्याचा मिलाफ आहे.
त्यांनी आतापर्यंत भारत आणि इतर देशांमधील अनेक समूह आणि एकल प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यात अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. भारतात त्यांनी दिल्ली आणि मुंबई येथे अनेक एकल प्रदर्शने आयोजित केली आहेत. सामुह प्रदर्शनांमध्ये त्यांनी एस एच रझा आणि एम एफ हुसैन यांच्याबरोबर आपली प्रदर्शने भरवली आहेत. भारत आणि इतर देशांमधील त्यांच्या प्रदर्शनांना चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. प्रसार माध्यमे आणि कलेच्या जाणकारांकडून त्यांच्या कलाकृतींची नेहमीच वाहवा झाली आहे.
कला प्रदर्शन : ‘एलाहीया २०१५’
स्थळ : कॅच गॅलरी, वांद्रे, मुंबई
तारीख : २७ ते ३१ मार्च २०१५
वेळ : सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत दररोज