लीएस्ल कोट्टा डिसोझा यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु
प्रख्यात कलाकार लीएस्ल कोट्टा डिसोझा आपल्या चित्रकृतींचे ‘ड्रॉविंग द स्टीच’ हे प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरी येथे २७ मार्चपासून सुरु झाले असून ते १० एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे. रविवार आणि ३ एप्रिल रोजीचा गुड फ्रायडे वगळता प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
‘ड्रॉविंग द स्टीच’ हे सिमरोझा आर्ट गॅलरी आणि टर्मरिकअर्थ यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे.
लीएस्ल कोट्टा डिसोझा यांनी १९८९ मध्ये मुंबई विद्यापीठातून तसेच गोवा कॉलेज ऑफ आर्टमधून फाईन आर्टमध्ये पदवी (चित्रकला) प्राप्त केली. त्यांनी १९९१ मध्ये स्टेट आर्ट अवार्ड (गोवा) प्राप्त केले तसेच २००० मध्ये ऑल इंडिया आर्ट एक्झीबिशन अवार्ड (एआयएफएसीएस, गोवा) प्राप्त केले.
लीएस्ल कोट्टा डिसोझा यांनी १९९८मध्ये गोवा येथील अलायन्स फ्रान्कायस गॅलरी येथे इतर केंद्रांप्रमाणेच वैयक्तिक चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. निवडक समूह प्रदर्शनांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन जम्मत गॅलरी, मुंबई येथे १९९९ मध्ये, २००० मध्ये एआयएफएसीएस, गोवा येथे ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन, २००१ मध्ये बंगलोर येथील झेन आर्ट गॅलरीमध्ये, २००२ मध्ये मुंबई येथे सिमरोझा आर्ट गॅलरी, २००५ मध्ये मुंबईत कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, २०१२ मध्ये दिल्ली येथील गॅलरी वन, २०१३ मध्ये पुणे येथील टील्तिंग आर्ट गॅलरी आणि इतरही कित्येक प्रतिष्ठित स्थळी ही प्रदर्शने भरवली गेली आहेत.
लीएस्ल यांना अमेरिकेत २००२ साली १७व्या राष्ट्रीय ईजीए प्रदर्शनामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. १९९२मध्ये देशभरात त्यांना विविध प्रतिष्ठित संस्था आणि गॅलरीमध्ये कलाकारांच्या शिबिरात आमंत्रित करण्यात आले आहे.
लिहिण्याचे माझे काम नाही, तशी वेळ आली की मला कापरे भरते; पण जेव्हा मी चित्रकला साकारते तेव्हा तसे होत नाही. चित्रे काढताना मात्र मी पुढे नदीप्रमाणे वाहत जाते आणि त्यातील बारकावे नदीप्रमाणे साठत जातात. मला हे कबूल केले पाहिजे की माझी चित्रे ही अशा माध्यमात साकारली जातात जी अनोखी आहेत, मात्र कित्येक पर्व हे काम महिलांसाठी सहजरित्या साकारले गेले आहे. दो-याच्या वापराचे शोध लावणे आणि छापील कापडावरील हा माझा छंद राहिला आहे. जेव्हा चित्र हा माझ्या कलेचा एकात्मिक भाग असल्याचे म्हटले जाते तेव्हा मी कापडावर धाग्यांनी शिवण्याची प्रक्रिया अंगिकारते आणि त्यातून रंगात्मक पार्श्वभूमी तयार होते, असे उद्गार लीएस्ल कोट्टा डिसोझा यांनी काढले.
त्या पुढे म्हणतात, छापील कापडाचा पाया करून किंवा त्याला माझ्या कलेसाठी पार्श्वभूमी म्हणून वापरण्याची प्रेरणा मला माझ्या सभोवतालच्या परिस्थितीतून मिळाली. माझ्या आजूबाजूला महिला आणि रंगांमध्ये विविध छटा दिसत होत्या आणि त्यातून त्यांची अधिक रूपे समोर येत होती. मला जेव्हा जेव्हा शक्य होते तेव्हा लोकांचे निरीक्षण करण्याची संधी मी साधते. हवा, पाणी आदी गोष्टी लोकांकडून परिधान होणाऱ्या कापडावर येतात आणि या गोष्टी मलाही भुरळ घालतात. या गोष्टी मी माझ्या चित्रांमध्ये वापरू शकते आणि माझ्या कामाच्या कक्षा रुंदावू शकते, हे लक्षात आल्यावर मी या गोष्टी कापडावर उतरवू शकते,याबाबत विश्वास निर्माण झाला. काही डिझाईन किंवा रंग मी कापडावर उतरवून छापील डिझाईनला एक वेगळा अर्थ देवू लागले. काही वेळा मी ही डिझाईन माझ्या विषयानुसार वापरली आणि काही वेळा ती मी पार्श्वभूमीवर वापरली. अशाप्रकारे माझ्या विषयासाठी आणि संकल्पनेसाठी त्याचा वापर झाला.
प्रदर्शन : २७ मार्च ते १० एप्रिल २०१५ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७
स्थळ : सिमरोझा आर्ट गॅलरी, दूरध्वनी-२३६७१९८३, स्थळ -सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२, भुलाभाई देसाई रोड, मुंबई –४०००२६.