वर्धा येथील अध्ययन भारतीच्या चिल्ड्रेन थिएटर अकादमीच्या वतीने येत्या १० मेपासून ‘ड्रामेबाजो का समर मेला’ या शीर्षकांतर्गत नाट्य कलेतून व्यक्तिमत्तव विकास साधण्यासाठी शिबिराचे आले आहे.
अध्ययन भारतीच्या वतीने गेल्या वर्षांपासून नाट्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. छोट्या मुलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांची पारख करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. या वर्षीही ‘ड्रामेबाजो का समर मेला’ आयोजित केला असुन, त्यातून अभिनय, रंगभूषा, नृत्य यासह अनेक थिएटर्स गेमच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेत वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यात हरीश इथापे, चैतन्य आठल्ये, सचिन माळवी, सुशील ससाणे, सुरभी बिपलाव, श्वेता क्षीरसागर यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संजय इंगळे तिगावकर (९७६५०४७६७२), हरीश इथापे (७५८८१८७७११), प्रदीप दाते (९४२२१४४८१७), सुहास नगराळे (९५९५८५६४८७), सुनिता इथापे (७५८८१८७७१३), संगीता इंगळे (९८२२७२७६७२) यांच्याशी संपर्क साधावा.