अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने १ मेपासून महिनाभराची ‘नाट्य कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सिने-नाट्य सृष्टीतील दिग्गज कलावंत हजेरी लावणार असून, ते शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेची वेळ सायंकाळी ५.३० ते ९.३० असणार आहे.
कै. मनीषा भोइर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे येथे होणा-या या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून मोहन जोशी, शरद पोंक्षे, विजय केंकरे, राजन भिसे, दीपक करंजीकर, प्रमोद पवार, गिरीश ओक, योगेश सोमण, प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुलकर्णी, नंदू पोळ, आशुतोष नेर्लेकर, अमेय दक्षिणदास, बाळ जुवाटकर आदी मान्यवर प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहेत.
कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी राजेंद्र बंग (९८२२३१३०६६), गौरी लोंढे (९९२३६८०८१९), संतोष रासणे (९८९००८५७९६), मनोज डाळिंबकर (८२३७३३२२२११), प्रणव जोशी (९७३०५१९००४) संतोष शिंदे (९८८१४०२३४२) यांच्याशी संपर्क साधावा.