भारतरत्न लता मंगेशकर अध्यक्ष;
संगीत विशारद कोर्ससाठी नोंदणी प्रारंभ
भारतरत्न लता मंगेशकर यांनी गेली ७ दशके आपल्या संगीताने विश्वावर राज्य केले. त्यांच्या संगीतातील अगाध ज्ञानाचे मार्गदर्शन आपल्याला एम आय टी “विश्वशांती संगीत कला अकादमी राजबाग पुणे या महाराष्ट्रातील संगीत अकादमीत मिळणार आहे.
ही संगीत अकादमी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी निवासी कार्यक्रम आपल्याला देत असून, एमआयटी या प्रसिद्ध संस्थेने स्थापन केली आहे. या संगीत अकादमीच्या भारतरत्न लता मंगेशकर अध्यक्ष आहेत. या अकादमीतील संगीत विशारद कोर्स २०१५-२०१८ नोंदणीस प्रारंभ करत असून, त्यासाठी ज्यांना संगीत शिकण्याची इच्छा असेल अशा इच्छुकांनी आपली नाव नोदणी १५ मे २०१५ पर्यंत करायची आहेत.
एमआयटी “विश्वशांती संगीत कला अकादमी एक संगीत सांस्कृतिक प्रवास जो आगळ्या वेगळ्या अनुभवाची अनुभूती दईल. ही अकादमी भारतीय शास्त्रीय संगीत प्रचारला समर्पित अशी पुणे मधील एक अद्वितीय अशी संस्था असून ती १२५ एकरांत एमआयटी परिसरात आहे. या संस्थेमध्ये शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी विद्यालय, पत्रकारिता आणि प्रसारण स्कूल अशा वेगवेगळ्या संस्थासुद्धा आहेत.
या संस्थेची इमारत अद्वितीय रचनेची असून त्यामध्ये (सा, रे, ग, मा, पा, ध, नी) ही जे संगीताचे ७ स्वर आहेत त्या प्रमाणे ७ द्योतक घुमट उभे केले आहेत आणि ८ वा मधला घुमट आहे तो ओमचा द्योतक म्हणून उभे केले असून, विश्वात अशी एकमेव पहिली रचना आहे.
एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमी या प्रशिक्षण आणि शिक्षण देणा-या संस्थेमध्ये जगातील वेगवेगळ्या ११२ हून अधिक संगीताची वाद्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला आणि त्या बद्दल संपूर्ण माहितीसुद्धा मिळू शकेल. तसेच या अकादमीमध्ये आपल्याला फुल टाइम, पार्ट टाइम, विकेंड कोर्स तसेच भारतीय संगीत जसे गायन, वायोलिन, बासरी, सितार, हार्मोनियम, तबला, पखवाज आणि कथक असे प्रकारसुद्धा शिकता येतील. संगीत विशारद कोर्ससाठी ३ वेगवेगळे कोर्स ठेवले आहेत. त्यामध्ये “विश्वशांती संगीत संस्कृती दर्शन” हा एक २ वर्षाचा कोर्स असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना संगीताच्या मुलभूत संकल्पना काय आहेत हे शिकवले जाईल.
” विश्वशांती संगीत विशारद” हा ३ वर्षाचा कोर्स असून त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक कामगिरी, क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. “विश्वशांती संगीत अलंकार” हा २ वर्षाचा उच्चस्तरीय कोर्स असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रोफेसर डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष सांगतात की, “एमआयटी ही शिक्षणापलीकडे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून आम्ही येथे मेडिसीन, व्यवस्थापन, फार्मसी, अभियांत्रिकी, डिझाईन, मास कम्युनिकेशन आणि आगळीवेगळी अशी एकमेव संगीत अकादमी सुरु केली असून आम्हाला त्यासाठी प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचा आशीर्वाद लाभला आहे”.